Thursday, April 25, 2024
Homeधुळेकापूस व्यापार्‍याचे पावणेतीन लाख लांबविले

कापूस व्यापार्‍याचे पावणेतीन लाख लांबविले

धुळे  – 

गुजरात राज्यात कापूस विकून घर परतणार्‍या व्यापार्‍याच्या बॅगमधून चोरट्याने दोन लाख 66 हजाराची रोकड लांबवल्याची घटना शहरातील धुळे बसस्थानकावर घडली. तर दुसर्‍या बॅगेच्या भागात ठेवलेले दोन लाख रुपये चोरट्याच्या हाती लागले नाहीत.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, धुळे तालुक्यातील नंदाळे येथे राहणारे शेतकरी विकास पाटील हे गुजरात राज्यात कापूस विक्रीसाठी गेले होते. कापूस विक्रीनंतर चार लाख 66 हजार रुपये एका रेग्जीनच्या बॅगमध्ये ठेवून त्यांनी परतीचा प्रवास केला.

बॅगमध्ये पैसे ठेवतांना त्यांनी पांघरण्यासाठी म्हणून घेतलेल्या ब्लॅकेटमध्ये एक बाजूला दोन लाख तर दुसर्‍या बाजुला दोन लाख 66 हजार 660 रुपये ठेवले होते.

काल सायंकाळी अहमदाबाद येथून अहमदाबाद-औरंगाबाद या गुजरात डेपोच्या बसने त्यांनी प्रवास केला. आज सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास ते धुळे बसस्थानकावर उतरले.

त्यांना गावी जाण्यासाठी गिरणा डॅम ही बस सकाळी पावणे आठ वाजता असल्याने ते बसस्थानकावरच थांबले. दरम्यानच्या काळात त्यांनी बाहेर जावून चहा व नास्ता घेतला.

त्यानंतर गिरणा डॅम बसमध्ये चढत असतांना त्यांची बॅग चोरट्याने कापली व बॅगेच्या एका कप्प्यातील दोन लाख 66 हजार 660 रुपये लांबविले.

पैसे चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या