Type to search

जळगाव फिचर्स

कापूस खरेदी केंद्र आजपासून गजबजणार

Share

जळगाव  –

जिल्हयातील 9 व विभागातील 7 अशा केंद्रांवर कापूस साठवण्साठी जागा नसल्याच्या कारणावरून राज्य कापूस पणन महासंघ व सीसीआयतर्फे जिल्हयात होणारी कापसाची खरेदी दि.17फेब्रुवारी पासून एक आठवडयासाठी थांबवण्यात आली होती.

ती पुन्हा सोमवार दि.24 पासून सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे या कापूस खरेदी केंद्रांवर रविवार सकाळपासूनच नव्हेतर शनिवार सायंकाळपासून ट्रॅक्टर वा अन्य वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असल्याचे चित्र जिल्हयाभरातील कापूस खरेदी केंद्रावर दिसून येत आहे.

महाराष्ट राज्य कापूस पणन महासघातर्फे जिल्हयातील कासोदा, पारोळा, दळवेल, अमळनेर, भडगाव व नाशिक जिल्हयातील मालेगाव अशा सात केंद्रावर कापूस खरेदी सुरू करण्यात आली होती.
गेल्या काही दिवसांपासून परदेशात कोरोना व्हायरसमुळे कापसाचे प्रमुख खरेदीदार देशांकडून मागणी कमी झाल्याने निर्यातीवर मोठा परीणाम झाला होता.

त्यामुळे शेतकर्‍यांकडील खरेदी केलेल्या कापसाची प्रक्रिया करून काढण्यात आलेली सरकी, तयार झालेल्या गठानी व कापसाचे उत्पादन ठेवण्यास जागा शिल्लक नसल्याने तूर्त एक आठवडा कापूस खरेदी बंद ठेवण्याच निर्णय घेण्यात आला होता.

या आठवडाभरात नव्याने खरेदीझालेल्या उत्पादनासाठी जागा निर्माण करून सरकी व गठाणींची व्यवस्था गुदामांमधे करण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सीसीआय व पणन महासंघातर्फे आजपासू पुन्हा नियमितपणे सर्वच कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदीस सुरूवात करण्यात येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!