Type to search

Featured सार्वमत

नगरमध्ये एकाच दिवसात दोन नगरसेवकांना पोलिसांकडून अटक

Share

मनपा सभापती मुदस्सर शेखसह सुनील त्र्यंबकेच्या मुसक्या आवळल्या

अहमदनगर (प्रतिनिधी) – पोलिसाचे अपहरण करून मारहाण केल्याच्या गुन्ह्यातील फरार असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक सुनील त्र्यंबके याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याच सोमवारी सायंकाळच्या सुमारास महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती बसपा नगरसेवक मुदस्सर यालाही अटक करण्यात आली आहे. तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली. सर्जेपुरा परिसरात माजी नगरसेवक आरिफ शेख व स्थायी सभापती मुदस्सर शेख यांच्या दोन गटांमध्ये महापालिका निवडणूक वादातून हाणामारी झाली होती. या गुन्ह्यात शेख याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात शेख फरार होता. सोमवारी सायंकाळच्या सुमारास तोफखाना पोलिसांनी त्यांच्या अटकेची कार्यवाही केली आहे.

नगरसेवक त्र्यंबके याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने पोलीस कर्मचार्‍यास त्यांच्या राहत्या घरून दुचाकीवर बळजबरीने बसवून संपर्क कार्यालयात आणले. त्यानंतर नगरसेवक त्र्यंबके व त्याच्या साथीदारांनी सदर पोलीस कर्मचार्‍यास लाकडी दांडके, लोखंडी गजाने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. या गुन्ह्यात त्र्यंबके याला दुपारी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. एकाच दिवशी पोलिसांनी नगर शहरात एकाच दिवशी महापालिकेच्या दोन नगरसेवकांवर कारवाई केल्याने नगरमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!