अपक्ष नगरसेवकाचे साडे सात लाखाचे नुकसान

0
शहादा । ता.प्र. – येथिल पालिकेचे बांधकाम सभापती सद्याम तेली यांच्या हत्येचा राग मनात ठेऊन संतप्त जमावाने अपक्ष नगरसेवक रियाज कुरेशी यांच्या घरावर शंभर ते दीडशेच्या जमावाने घरावर हल्ला चढवित घरातील संसारोपयोगी वस्तू, रोख रक्कम सोन्याची लुट करीत घराला आग लावून सुमारे 7 लाख 39 हजार रूपयाचे नुकसान झाल्याची फिर्याद शहादा पोलीसात नोंद आहे.
शहादा नगरपरिषदेचे अपक्ष नगरसेवक रियाज अब्दुल लतीफ कुरेशी यांनी शहादा पोलीसात दिलेली फिर्यादीत म्हटले आहे, दि.14 रोजी गरीब नवाज वसाहतीत पाण्याचे टँकर वरून नगरसेविकापुत्र व माजी नगरसेवक यांच्यात झालेल्या शाब्दीक चकमक व हाणामारीत जखमींना पाहण्यासाठी एमआयएमचे नगरसेवक सद्दाम तेली हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह जखमींना पाहण्यासाठी गेले, त्या वेळीस एक युवकाने सद्याम तेली यांच्या पाठीमागे धारदार हत्यारेने वार करुन जखमी केले.
सायंकाळी तेली यांच्या मृत्यूची चर्चा सुरू झाली. त्यामुळे एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी संतापाच्या भरात सात ते आठ घरे जाळण्यात आली.

गुरूवारी सकाळी मयत सद्याम तेली यांचा मृतदेह शहरात सकाळी 10.30 वाजता आणला असता त्याचदरम्यान एमआयएमचे 100 ते 150 कार्यकर्ता यांनी आपल्या घरावर हल्ले करीत घरात आई वडील पत्नी भाऊ यांना मारहाण करीत घरात घुसून संसारोपयोगी वस्तू रोख रक्कम, मौल्यवान वस्तुची लूट केली. त्यानंतर घराला आग लावली व संतप्त जमावाने लूट केली.

यात 2 लाख 65 हजार रूपये रोख, 30 हजार रूपये किमतीचे पत्नीचे मंगळसुत्र, 40 हजार रूपये किमतीचे कानातील टोंगल,. पंधरा हजार रूपयांचे फ्रीज, सात हजार रूपये किंमतीचे सोफासेट, पंधरा हजार रूपये किंमतीचा एलईडी टिव्हीसंच तसेच 35 हजार रूपये किंमतीचे नवीन कपडे रमजान ईदसाठी खरेदी केलेले होते.

असे एकूण 4 लाख 39 हजार किमतीचे तसेच तीन लाख रूपयांचे घराला आग लावून जाळून टाकले असे 7 लाख 39 हजार रूपयाचे नुकसान नगरसेवक रियाज कुरेशी यांचे झाले आहे.

याप्रकरणी जुबेर जीयो सिमवाला, कासीफ अच्छू बेकरीवाला, जुनेद नासीर हालीमवाला, यासह 100 ते 150 युवकांना विरोधात नगरसेवक रियाज कुरेशी यांनी तक्रार नोंदविली आहे.

 

LEAVE A REPLY

*