कैलासमामा व्हेंटिलेटरवर

0

रूबीला शिफ्ट करण्यासही धोका

अहमदनगर – नगरसेवक कैलासमामा गिरवले यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. ससून हॉस्पिटलमधून रुबीमध्ये हलविण्यालाही धोका निर्माण झाल्याने डॉक्टर कोणतीच रिस्क घेण्यास तयार नाही. मामा व्हेंटीलिटरवर असून त्यांची प्रकृती अत्यावस्थ झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मामांना रुबीमध्ये शिफ्ट केले जाणार होते. त्यासाठी आज नगर कोर्टाची परमीशनही घेण्यात आली. रुबीची कार्डियाक व्हॅन व डॉक्टरही ससूनमध्ये पोहचले. मात्र डॉक्टरांनी प्रकृती चिंताजनक असल्याने शिफ्ट करणेही रिस्क आहे असे सांगत हतबलता दर्शविली. त्यानंतर ससूनमध्येच मामांवर उपचार सुरू करण्यात आले आहे. प्रकृती खालावली असून ते अत्यवस्थ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड प्रकरणी गिरवले यांना अटक करण्यात आली होती.

केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या चौकशीसाठी आ. संग्राम जगताप यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशी बोलाविण्यात आले होते. यावेळी जमावासह अधीक्षक कार्यालयातून गिरवले यांनी आ. जगताप यांची सुटका केली. यावेळी गिरवले यांच्यासह जमावाने त्याठिकाणी धुडगूस घातला होता. याप्रकरणी गिरवले यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर माळीवाडा येथे विनापरवानगी फटाके ठेवल्याप्रकरणी दुसरा गुन्हा गिरवले यांच्या विरोधात दाखल करण्यात आला होता. तोडफोड प्रकरणाची पोलीस कोठडी रविवारी संपणार होती. दरम्यान, गिरवले यांना काल सकाळीच विना परवानगी फटाके प्रकरणी कोतवाली पोलीसांकडे वर्ग करण्यात आले होते. त्यांना न्यायालयात नेण्यापूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांने पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*