अखेर खूनाच्या आरोपातील भाजपा नगरसेवक शेट्टीचे पद वाचले

0
नाशिक (प्रतिनिधी) | नाशिक महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कुण्या नगरसेवकाला थेट कारागृहातून पोलिस बंदोबस्तात महासभेला घेऊन येण्याची आगळी घटना आज घडली. त्यामुळे राजकीय शहरात राजकीय चर्चेत दुपारनंतर हाच विषय मध्यवर्ती राहिला.

सलग सहा महासभांना गैरहजर राहिला तर नियमानुसार आपोआप नगरसेवक रद्द होण्याच्या तरतूदीमुळे गेल्या पाच महिन्यांपासून खूनाच्या आरोपाखाली नाशिक मध्यवर्ती कारागृहात असलेल्या भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टी आजच्या महासभेला पोलिस बंदोबस्तात हजर राहिला. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद जाण्याची नामुष्की टळली असली, तरी राजकीय वर्तुळात त्याच्या हजेरीचीच चर्चा आहे.

न्यायालयाने त्याला महासभेला हजर राहण्याची परवानगी दिल्याने दुपारी चार पोलिस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात तो महापालिकेत आला. त्यानंतर त्याच्या नावाने यापूर्वीच पटलावर मांडलेल्या विषयांना मंजूरी द्यावी अशी विनंती त्याने महापौरांना केली. त्यानंतर महापौरांनी त्याचे विषय मंजूर करण्याला संमती दिल्याने दुपारी तो पुन्हा कारागृहाकडे रवाना झाला.

या सर्व प्रकारामुळे त्याचे नगरसेवकपद जाण्याची नामुष्की टळली. त्यासाठी भाजपाच्या अनेक दिग्गजांनी थेट वरच्या पातळीवर संपर्क साधून त्याचे पद आणि संभाव्य पोटनिवडणूकीचा त्रास वाचविल्याची चर्चा महापालिकेच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे तहकुबीनंतर आज पुन्हा घेण्यात आलेल्या महासभेला त्याला हजर राहता करता आले यामुळे काही नेते आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

दरम्यान महापालिकेत त्याने आपल्या सहकारी नगरसेवकांशी संवाद साधला. काही नगरसेवक पूर्णवेळ त्याच्यासोबत असल्याचेही चित्र होते.

नगरसेवक शेट्टींच्या जीवदानासाठीच महासभा तहकूबीची चर्चा

LEAVE A REPLY

*