नाशिकमध्ये शिवसेनेला धक्का; नगरसेवक दिलीप दातीर यांचा मनसेत प्रवेश
Share

नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर यांनी काल (दि.२९) पक्षाला जय महाराष्ट्र केला. दातीर हे आगामी विधानसभेसाठी नाशिक पश्चिममधील इच्छुक उमेद्वारांपैंकी एक होते. शिवसनेनेने एबी फॉर्मचे वाटप केल्यानंतर दातीर यांच्या तिकीटाची आशा जवळपास मावळली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, दातीर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला असून नाशिक पश्चिममध्ये शिवसेना विरोधात मनसेचे मोठे आव्हान ठाकणार असल्याचे बोलले जात आहेत.
अद्याप पक्षाकडून दातीर यांना उमेदवारी देण्यात येणार आहे की नाही हे जाहीर केले नसले तरी दातीर मनसेकडून निवडणूक लढविण्याची शक्यतेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
दातीर यांनी आज मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, अभिजित पानसे, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, माजी आमदार नितीन भोसले, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, मनसेचे माजी गटनेते सलिम मामा शेख, नगरसेवक योगेश शेवरे यांच्यासह मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.