Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

कॉर्पोरेट कर परिणाम : शेअर बाजारात उसळी

Share

मुंबई  | प्रतिनिधी

शुक्रवारी गोव्यातील जीएसटी परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आज सोमवारीही शेअर बाजाराने उसळी घेतली.

शुक्रवारी अर्थमंत्री सीतारमण यांनी कॉर्पोरेट कर कमी करण्याची घोषणा केली. त्यानंतर शुक्रवारीच शेअरबाजाराने मोठी उसळी घेतली होती. सोन्याचे दरही यामुळे आटोक्यात आले होते.

तेव्हाही शेअर बाजाराचा निर्देशांक ११११.२१ अंकांनी वाढलेला होता. तर आजही निर्देशांक ३९,१२५.८३ तर निफ्टी २६८ अंकांनी वाढून ११,५४२.७० होता.

सरकारचा चालू आर्थिक वर्षाचा १.४५ लाख कोटी रुपयांचा महसूल त्यामुळे बुडणार आहे. पण या निर्णयामुळे बाजारात थोडी धुगधुगी आली आहे. त्याचा परिणाम आजही दिसून येत आहे.

आयटीसी, एल अँड टी, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स आणि एम अँड एमच्या शेअर्सचे दर ५ ते ७ टक्क्यांनी वाढले आहेत. या कॉर्पोरेट टॅक्स कपातीकडे परदेशी गुंतवणूकदार कशाप्रकारे पाहतात, याकडे अभ्यासकांचे लक्ष आहे. सध्याच्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स ३० टक्क्यांहून घटवून २२ टक्के करण्यात आला आहे, तर १ ऑक्टोबर २०१९ नंतर सुरू होणाऱ्या नव्या कंपन्यांसाठी हा दर २५ टक्क्यांवरून घटवून १५ टक्के करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!