Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

कार्पोरेट करात कपात; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

Share

गोवा | वृत्तसंस्था

मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि उद्योग क्षेत्राला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने आज महत्वाची घोषणा करत कार्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज गोव्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या की, जागतिक मंदीचा सामना करण्यासाठी सवलत न घेणाऱ्या कंपन्यांच्या करामध्ये कपात करून दर 22 टक्के करण्यात आले आहेत.

उद्योग क्षेत्राला उभारी देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. उत्पादन आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात केलेल्या बदलांची अंमलबजावणी या आर्थिक वर्षापासून करण्यात येणार असून, कोणतीही सवलत न घेणाऱ्या भारतीय कंपन्यांना 22 टक्के कर द्यावा लागेल आणि अधिभार आणि सेस मिळून एकूण 25.17 टक्के कर द्यावा लागेल असे त्यांनी सांगितले.

BSEने दिलेल्या माहितीनुसार बाजारात तेजी आल्यानंतर काही मिनिटातच बाजारमुल्य 143.45 लाख कोटींवर पोहोचले. हेच बाजारमुल्य गुरुवारी 138.54 लाख कोटी इतके होते. याचाच अर्थ बाजार मुल्यात 5 लाख कोटींची वाढ झाली. BSEचा इतिहास पाहता 10 वर्षात प्रथमच एका दिवसात सेन्सेक्समध्ये 2 हजार अंकांची वाढ झाली आहे. तर निफ्टीमध्ये देखील 500 अंकांची वाढ होत तो 11 हजार 250वर पोहोचला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!