परतीच्या पावसाने शेतीपिकांचे नुकसान; भरपाई देण्याची मागणी

0
गोळशी वार्ताहर | दिंडोरी तालुक्यातिल पश्चिम पट्ट्यात परतिच्या पावसाने गेल्या चार ते पाच दिवसापासुन थैमान घातले असुन शेती पिकाचे अतोनात नुकसान केले आहे.

गेल्या काही दिवसापासून सुरु असणाऱ्या पावसाच्या संततधारेमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेला आहे. पश्चिमपट्ट्यात प्रामुख्याने भात शेती नागली उडिद पिके घेतली जातात, प्रामुख्याने सह्याद्रीच्या डोंगराळ भागात असणाऱ्या पट्ट्यात मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या चार ते पाच दिवसापासुन सुरु झालेल्या अवकाळी पावसाने जनु या भागातील शेतकर्यांची तारांबळच केली आहे कोरडवाहु शेती साठी एक पावसाची अत्यंत गरज होती. पण काही भागात खरीपाचे पिकाची नासाडी झाल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

चार ते पाच दिवसापासुन नदी नाली तुडुंब भरुन वाहत आहेत. नदी नाल्याना पहिल्या पावसाप्रमाने पुर आले आहेत. भात, उडिद पिकांचे अतोनात नुकसान झाले आहेत. ऐन कापणीच्या काळात या पिकाना परतीच्या पावसाने झोडपल्याने मोठे नुकसान झाले आहे.

पेठ तालुक्यातील करंजाळी आड कोहर भायगाव तसेच दिंडोरी तालुक्यातील गोळशी जालखेड झार्ली आंबेगण कोकणगाव या भागात भात पिकाचे कापनीसाठी आलेल्या भात पिकाचे जमिनीलगत झोपउन जनु संपुर्ण पिकच पान्यावर तरंगताना दिसत आहेत.

यात शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत तसेच जालखेड कोकणगाव या ठिकानी द्राक्ष बागायतदार शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आजच्या मितीस शेतकरी पुर्णपणे संकटात सापडला आहे.

एक बाजुने शासनाचे आडमुठे धोरण तर दुसर्या बाजुने नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी आर्थीक दृष्टीने अडचनित सापडला आहे. या सर्व अडचणीच्या वेळेस इंशुरंस कपण्यानी व बैकानी अशा अडचणीच्या काळात शेतकर्याना आर्थिक मदत करावी किवा कर्ज माफी करावी.

आज मितिस द्राक्ष बागावर शेतकर्यांचा ३०ते ४० % ने खर्च वाढला आहे अवकाळी पावसाने द्राक्ष बागावर दावनी रोगाचे प्रमान वाढले आहे जे बाग सध्या स्थितित पोंगा अवस्थेत आहेत त्यानचे द्राक्ष जिरनीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे दिवसातुन बागाना तिन ते चार वेळेस फवारणी करावी लागत आहे.

त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तरी संमधीत अधीकारी यानी याची त्वरित दखल घेउन झालेल्या पिकानचे नुकसान पंचनामे करुन शेतकर्याना नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

LEAVE A REPLY

*