Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशकरोनाने देशात गेल्या चार दिवसांत 911 जणांचा मृत्यू

करोनाने देशात गेल्या चार दिवसांत 911 जणांचा मृत्यू

सार्वमत

नवी दिल्ली – देशात गेल्या चार दिवसांत 911 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनूसार, भारतात करोनाच्या शिरकावानंतर 1000 जणांच्या मृत्यूची नोंद होण्यासाठी 48 दिवस लागले होते. मात्र आता गेल्या चार दिवसांत 911 जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार लॉकडाउनचे नियम शिथील करत असताना समोर येणारी ही आकडेवारी चिंताजनक आहे.
करोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या 25 हजारांवर पोहोचण्यासाठी 87 दिवस लागले होते. 26 एप्रिलला भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या 25 हजार होती. पण यामध्ये वेगाने वाढ होत असून फक्त सहा आठवड्यात रुग्णसंख्या 2 लाख 26 हजार 770 वर पोहोचली आहे. भारतात 12 मार्च रोजी पहिल्या करोना रुग्णाची नोंद झाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या