Thursday, April 25, 2024
Homeनगरकोरोना : नेवासा, जामखेडमध्ये प्रत्येकी एक पॉझिटिव्ह

कोरोना : नेवासा, जामखेडमध्ये प्रत्येकी एक पॉझिटिव्ह

हॉटस्पॉट कालावधीत आणखी 8 दिवसांची वाढ । जामखेडचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्याचा तर नेवासा येथील व्यक्तीचा 14 दिवसानंतरचा दुसर्‍या अहवालाचा समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे शुक्रवारी पाठविलेल्या अहवालांपैकी दोन व्यक्तींचे अहवाल शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आले आहेत. यात जामखेडमधील मयत व्यक्ती तर दुसरा नेवासा तालुक्यातील बाधीत व्यक्तीचा 14 दिवसानंतरच्या दुसर्‍या अहवालाचा समावेश आहे. उर्वरित 32 अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.

- Advertisement -

शनिवारी जिल्हा आरोग्य विभागाला मिळालेल्या अहवालात बाधीत रुग्णापैकी एक व्यक्ती जामखेड येथील आहे. तर दुसरी व्यक्ती नेवासा येथील आहे. जामखेड येथील व्यक्तीचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. मात्र, त्याचा अहवाल आला नसल्याने त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. शनिवारी संबंधीत व्यक्तीचा अहवाल आला आणि तो कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, नेवासे येथील एका व्यक्तीचा 14 दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले.

बाधीतांचा आकडा 29
जिल्ह्यात आधी कोरोना बाधीतांची संख्या 28 (पुण्याचा धरून) होती. जिल्ह्यात 12 मार्चला कोरोना बाधीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर 13 एप्रिलपर्यंत 28 रूग्ण आढळले. मात्र, प्रशासनाने, आरोग्य आणि पोलिस यंत्रणेने लॉकडाऊन काळात चांगली भूमिका बजावल्याने 13 एप्रिलनंतर जिल्ह्यात एकही बाधीत आढळला नव्हता. दरम्यान शनिवारच्या अहवालात जामखेडमधील मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा 29 झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या