Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशजगभरात 3 लाख 47 हजार करोनाग्रस्तांचा मृत्यू

जगभरात 3 लाख 47 हजार करोनाग्रस्तांचा मृत्यू

सार्वमत

नवी दिल्ली – जगभरातील करोनाग्रस्तांची संख्या 55 लाख 20 हजार 901 झाली आहे. तर आतापर्यंत 3 लाख 47 हजार 28 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. अशातच दिलासादायक बाब म्हणजे 23 लाख 13 हजार 753 रुग्णांनी कोरोरणावर मात केली असून ते घरी परतले आहे.जगभरातील जवळपास 74 टक्के करोनाचे रुग्ण फक्त 12 देशांमध्ये आढळून आले आहेत. या देशांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या 41 लाख आहे.

- Advertisement -

जगभरात कोरवर्णाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. अमेरिकेत आतापर्यंत 16 लाख 86 हजार 436 लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर एकूण 99 हजार 300 रुग्णांचा मृत्यू झालाआहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक मृत्यू ब्रिटनमध्ये झाले आहेत. ब्रिटनमध्ये 36 हजार 793 लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला असून एकूण 2 लाख 59 हजार 559 लोकांना करोनाची लागण झाली आहे.

तर ब्रिटनमधील रुग्णांची संख्या रूस, स्पेन आणि ब्राझीलपेक्षा कमी आहे. यानंतर इटली, फ्रान्स, जर्मनी, टर्की, इराण, भारत यांसारख्या देशांमध्ये करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 22 हजार 716 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच रूसमध्ये3,541, स्पेन 28,752, यूके 36,793, इटली 32,785, फ्रान्स 28,367, जर्मनी 8,371, टर्की 4,340 तरइराणमध्ये7,417 रुग्णांचा करोनामुळे बळी गेला आहे.

अशातच भारतातही करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात करोनाबाधितांची संख्या 1 लाख 38 हजार 845 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 57 हजार 720 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तसेच, देशात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4021 झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या