Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रजगभरातील करोनाग्रस्तांची संख्या 44 लाखांवर

जगभरातील करोनाग्रस्तांची संख्या 44 लाखांवर

सार्वमत

नवी दिल्ली – जगभरात करोनाचा कहर सुरूच आहे. जगभरात आतापर्यंत 44 लाखांपेक्षा अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जगभरातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या आता 44 लाख 46 हजार 031 इतकी झाली आहे. तर करोनामुळे आतापर्यंत 2 लाख 98 हजार 442 रुग्णांचा बळी गेला आहे. गेल्या 24 तासांत जगात 88 हजार 202 नव्या करोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून 5,314 लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 16 लाख 70 हजार 474 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 72 टक्के करोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 32 लाखांजवळ करोना रुग्ण आहेत. जगात करोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश करोना केसेस आणि एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 14 लाख 30 हजार 348 लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

तर 85 हजार 197 लोकांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 33 हजार 186 लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर येथील करोनाबाधितांची संख्या 2 लाख 29 हजार 705 इतकी आहे. स्पेनमध्ये करोनामुळे 27 हजार 104 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 2 लाख 71 हजार 095 लोकांना करोनाची लागण झाली आहे. करोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसर्‍या क्रमांकावर आहे.

इटलीत आतापर्यंत 31 हजार 106 लोकांचामृत्यू झालाआहे. तर करोनाबाधितांचा आकडा 2 लाख 22 हजार 104इतका आहे. जर्मनी, रशिया, ब्राझिलसह दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये करोना बाधितांचा आकडा हा 1 लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये कोरानामुळे 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 85 हजारांवर गेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या