Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रदिलासा! पुण्यात आज कोरोनाने एकही मृत्यू नाही

दिलासा! पुण्यात आज कोरोनाने एकही मृत्यू नाही

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यामध्ये रोज होणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युंमुळे हादरलेल्या पुणे शहराला रविवारी काहीसा दिलासा मिळाला. रविवारी संध्याकाळपर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये एकाही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. दरम्यान, रविवारी दिवसभरात आणखी 42 कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच मृत्येचेही प्रमाण वाढले आहे. रोज किमान चार जणांचे मृत्यू काही दिवसांपासून होत आहेत. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातून रविवारी काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, करोनाचा संसर्ग झालेले 18 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 15 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 11 ससूनमध्ये तर इतर चौधांवर खासगी हॉस्पिटलांमध्ये उपचार सुरू आहेत.

पुण्यात कोरोना रुग्णांबरोबर मृतांची संख्या ही राज्याच्या तुलनेत अधिक वाढत आहे. 500 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यातील मृतांचा आकडा पाहिला तर देशात सर्वाधिक मृत्यूदर पुणे जिल्ह्याचा असल्याचे दिसते. मुंबईत मृतांची संख्या सर्वाधिक असली तरी रुग्णांची संख्या अधिक असल्याने मृत्यूदर शनिवारपर्यंतहा टक्क्याच्या जवळपास आहे पुण्याचा मृत्यूदर हा 11.96 टक्के असून त्या तुलनेने जगाचा मृत्यूदर 5.97 टक्के आहे. बाधित रुग्णांची संख्या वाढण्याबरोबरच मृतांचा आकडा वेगानं वाढत आहे.

मृत्युदर कमी करण्यासाठी त्रिसूत्री
पुण्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी त्रिसूत्री निश्चित करण्यात आली आहे. लवकर निदान करणे, लक्षणे नसणार्‍यांवर उपचार, रुग्णसेवेचा दर्जा उंचावणे,अशी त्रिसूत्री निश्चित करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात आढावा बैठक घेतली. यादरम्यान, त्यांनी पुण्यातील कोरोना मृत्यूदर कमी करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना केल्या. त्यानुसार, पुण्यातील कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी ही त्रिसूत्री निश्चित करण्यात आली आहे. सरकारचे प्रमुख तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी ही त्रिसूत्री तयार केली आहे. कोरोनसंदर्भात झालेल्या बैठकीत ही त्रिसूत्री ठरवण्यात आली. या त्रिसूत्रीच्या आधारे पुण्यातील मृत्यूदर कमी करण्याचे नियोजन आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या