Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यातील करोनाग्रस्तांचा आकडा 3 हजार 720 वर

पुण्यातील करोनाग्रस्तांचा आकडा 3 हजार 720 वर

सार्वमत

पुणे (प्रतिनिधि) – पुणे जिल्हयात शनिवारी संध्याकाळपर्यंत करोना बाधित रुग्णांची संख्या 3 हजार 720 इतकी झाली असून 1 हजार 880 करोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 649 आहे तर करोना बाधित एकूण 191 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 142 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

- Advertisement -

दरम्यान, पुणे विभागातील 2 हजार 75 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात करोना बाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 271 झाली आहे. तर क्टीव रुग्ण 1 हजार 979 आहेत. विभागात करोना बाधीत एकुण 217 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 153 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी सातारा जिल्हयात 126 करोना बाधीत रुग्ण असून 45 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 79 आहे. करोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 353 करोना बाधीत रुग्ण असून 112 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 219 आहे. करोना बाधित एकूण 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील 43 करोना बाधीत रुग्ण असून 29 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 14 आहे. करोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 28 करोना बाधीत रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 18 आहे. करोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मे अखेरपर्यंत पुण्यातील करोना रुग्णसंख्या सुमारे 5 हजारांपर्यंत
पुणे (प्रतिनिधि) – पुणे शहरात करोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. मागील पंधरा दिवसांपूर्वी शहरात आढळणार्‍या रुग्णांची संख्या लक्षात घेता ती मे अखेरपर्यंत 9 हजाराहून अधिक होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सध्या करोनाबाधित आणि डिस्चार्ज रुग्णांची संख्या लक्षात घेता मे अखेरपर्यंत ही रुग्णसंख्या सुमारे 5 हजारांपर्यंत असेल, अशी शक्यता महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केली.
महापालिका आयुक्त शेखर गायकवाडपुणे स्मार्ट सिटीच्यावतीने नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्त्यावरील) स्मार्ट सिटी वॉर रूम पहाणी दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेखर गायकवाड, मनपा आयुक्त, तसेच रुबल अगरवाल, अतिरिक्त मनपा आयुक्त (जनरल) व शंतनु गोयल, अतिरिक्त मनपा आयुक्त (विशेष) आदी उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, पुणे शहरात काल अखेरपर्यंत 3 हजार 93 इतकी रुग्णसंख्या होती. यांपैकी 1 हजार 630 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या पुणे शहरातील अनेक रूग्णालयात 50 टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण उपचार घेत आहे. त्यामुळे मे अखेरपर्यंत शहरात 9 हजार 600 लोक रुग्ण असतील आणि तेवढी व्यवस्था आम्हाला करावी लागणार असं वाटलं होत. पण आता तेवढी गरज लागणार नसून महिन्याअखेरीस शहरात 5 हजार रुग्ण असतील अशी शक्यता त्यांनी व्यक्ती केली.भविष्यात शहरात रुग्णसंख्या जरी वाढत राहिली तरी त्या प्रमाणात बरे होण्याचे प्रमाणदेखील अधिक राहणार आहे. ही बाब आपल्या सर्वांच्या दृष्टीने समाधानाची आहे. दरम्यान, कालपर्यंत जिल्ह्यात 174 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी आपल्या सर्वांच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचेही आयुक्त गायकवाड म्हणाले. शहरातील मध्य भाग मोठ्या प्रमाणावर करोनाच्या आजारानं संक्रमित झाला आहे. त्यामुळे आता 18 तारखेपर्यंत शासनाच्या निर्णयानुसार त्या भागात कोणत्या सुविधा द्यायच्या ते ठरविले जाणार आहे. मात्र, उर्वरित शहरातील काही भाग अधिक प्रमाणात सुरू होण्याची शक्यता गायकवाड यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या