Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशदेशात 24 तासांत 5,611 नव्या करोना रुग्णांची नोंद

देशात 24 तासांत 5,611 नव्या करोना रुग्णांची नोंद

सार्वमत

नवी दिल्ली – देशात सोमवारी करोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाखांपेक्षा अधिक झाली आहे. त्यानंतर गेल्या 24 तासांत त्यात तब्बल 5,611 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत देशात आढळलेले हे करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तसेच 140 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

त्यामुळे आता देशातील करोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 6 हजार 750 वर पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली. एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर मंगळवारी दिवसभरात देशात 140 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्यामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता3,303 वर पोहोचली आहे.आतापर्यंत देशात करोनाचे 1 लाख 6 हजार 750 रुग्ण सापडले आहे. त्यापैकी 61 हजार 149 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर, 42 हजार 298 रुग्णांनी करोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या