Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातही 144 कलम लागू

Share

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – पाटबंधारे कर्मचारी व शेतकर्‍यांमध्ये खटके उडू लागले असून मुळा धरण व उजवा-डावा कालव्यांच्या लाभक्षेत्रातही 144 कलम लागू झाले आहे. धरण कालव्यापासून 200 मीटर अंतरावर 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास जिल्हाधिकार्‍यांनी बंदी घातली आहे.
उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू असताना पाटबंधारे खाते व शेतकर्‍यांमध्ये खटके उडत आहेत. वेळप्रसंगी टोकाची भूमिका म्हणून उजवा कालवा बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या 70 कर्मचारी तैनात असून नजिकच्या काळात पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे. कालव्याच्या आजूबाजूला 4 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी फिरकू नये. जिल्हाधिकारी यांनी 144 कलम लागू केले असून पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. शेतकर्‍यांनी आवर्तन यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी केले आहे.

दरम्यान पाणी सोडल्यानंतर परिसरातील विजपुरवठा 10 दिवस खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. पाण्याचा योग्य पध्दतीने नियोजन पाटबंधारे खात्याने केले आहे. आम्हाला पाणी उपसू द्या, अशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारीही हतबल झाले आहेत.
कर्मचारी व पाटबंधारे खाते यांच्यात वाद होत आहेत. शेतकर्‍यांनी ऐकले नाही तर कालवा बंद करण्याच्या मनस्थितीत पाटबंधारे खाते आहे.त्या दृष्टिकोनातून शेतकरी व पाटबंधारे खात्याचे कर्मचारी यांच्यामध्ये समन्वयाची गरज आहे. आवर्तनाला अडथळा आणल्यास कालवा बंद करण्यात येऊ शकतो.

अहमदनगर अंतर्गत मुळा धरण, भंडारदरा प्रकल्पातील प्रवरा उजवा व डावा कालवा, आढळा मध्यम प्रकल्प, घाटशीळ, पारगाव मध्यम प्रकल्प, मांडओहोळ मध्यम प्रकल्प, सर्व लघू प्रकल्पाच्या लाभक्षेत्रावरील सर्व शेतकर्‍यांनी आवर्तनासाठी पाटबंधारे खात्याला सहकार्य करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी कर्तव्य पार पाडीत असल्याने त्यांना सहकार्य करावे. शेतकर्‍यांनी कालवा अथवा चारीवर एकत्र येऊ नये. सर्व शेतकर्‍यांना नियमानुसार व मंजूर कोट्यानुसार पाणी मिळणार आहे. सर्वानी काटकसरीने पाण्याचा वापर करावा.
– किरण देशमुख
कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!