Type to search

Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या सार्वमत

हज यात्रा : सौदी सरकारने केले ‘हे’ आवाहन

Share

नवी दिल्ली – करोनाचा संसर्ग वाढतच आहे. हा धोका लक्षात घेऊन जगभरातील मुस्लिमांनी हज युात्रेची तयारी स्थगित करण्याचे आवाहन सौदी सरकारने केले आहे. सौदी अरेबिया सरकारने करोनाचा संसर्ग फैलावू नये यासाठी उमरा ही तीर्थयात्रा स्थगित केली होती. त्यानंतर हज यात्रेवर स्थगिती येणार असल्याची चर्चा होती.

सौदी अरेबिया सरकारचे हज मंत्री मोहम्मद बिन्तऐन यांनी शासकीय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, सौदी अरेबिया हज आणि उमरासाठी येणार्‍या नागरिकांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत जागतिक महासाथीच्या काळात सौदी अरेबिया आपले नागरिक आणि मुस्लिमांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे जगातील मुस्लिम बांधवांनी परिस्थिती पूर्वपदावर येण्याची प्रतिक्षा करावी असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!