Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशकरोनाचा इस्रोच्या अवकाश मोहिमेला फटका

करोनाचा इस्रोच्या अवकाश मोहिमेला फटका

सार्वमत

नवी दिल्ली – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) 2022 मध्ये पहिल्यांदा मानवाला अंतराळात पाठवणार आहे. भारताच्या या मोहिमेला करोनाचा फटका बसला आहे. रशियामध्ये इंडियन एअर फोर्सच्या चार फायटर पायलट्सचे प्रशिक्षण थांबले आहे. या पायलट्सची भारताच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेसाठी निवड झाली आहे. रशियामध्ये त्यांचे अंतराळवीर बनण्याचे प्रशिक्षण सुरु होते. पण सध्या लॉकडाऊनमुळे हे पायलट्स घरामध्ये बंदिस्त आहेत.

- Advertisement -

मानवी अवकाश मोहिमेसाठी निवड झाल्यानंतर करोना व्हायरसमुळे अशी परिस्थिती उद्भवेल याची कल्पनाही त्यांनी केली नसेल. मॉस्कोजवळच्या स्टार सिटीमधील गागारीन कॉसमोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांचे प्रशिक्षण सुरु होते. पण सध्या करोना व्हायरसमुळे त्यांचे प्रशिक्षण पूर्णपणे बंद आहे. हे पायलट्स घरामध्ये बंदिस्त आहेत. रशियामध्ये एक लाख करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. बुधवार संध्याकाळपर्यंत तिथे करोनामुळे 972 जणांचा मृत्यू झाला आहे.

या मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या चारही अवकाशवीरांची प्रकृती उत्तम आहे. जीसीटीसीच्या मेडिकल तज्ज्ञ त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत, अशी माहिती ग्लाव्हकॉसमॉसचे महासंचालक दिमित्री लॉसक्युतोव्ह यांनी दिली. ग्लाव्हकॉसमॉस ही रशियन सरकारच्या मालकीची अवकाश कंपनी आहे.

भारतीय अवकाशवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी जून 2019 मध्ये ग्लाव्हकॉसमॉस आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो यांच्यामध्ये करार झाला आहे. जीसीटीसीच्या कर्मचार्‍यांबरोबर मानवी अवकाश मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय वैमानिकांनाही लॉकडाऊनचे पालन करावे लागेल. रशियातील करोना व्हायरसच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या वैमानिकांचे प्रशिक्षण पुन्हा सुरु करण्याबाबत निर्णय होईल, असे दिमित्री लॉसक्युतोव्ह यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या