Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विश्‍वनाथा, अधिष्ठाता डॉ.फरांदेंचा अहवाल निगेटीव्ह

Share

स्वतःहून होम क्वारंटाईनमध्ये असल्याचा खुलासा

राहुरी विद्यापिठ (वार्ताहर) – राहुरी येथील म. फुले कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा व अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांची अहमदनगर जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यांना दि. 17 ते 19 मार्च 2020 पर्यंत रुग्णालयात विलनीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ते परत विद्यापीठात आले. विद्यापीठात आल्यापासून ते दोघेही होम क्वारंटाईनमध्ये आहेत. देशात आल्यापासून ते आजतागायत त्यांनी कोणत्याही प्रकारचा सत्कार स्विकारला नसून कोणत्याही कार्यक्रम/बैठका यांना हजर राहिलेले नाहीत व स्वतःहून होम क्वारंटाईनमध्ये आहेत असा खुलासा करण्यात आला आहे.

कुलगुरु डॉ. के. पी विश्‍वनाथा व अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांची दि. 1 ते 8 मार्च 2020 दरम्यान वॉशिंग्टन स्टेट युनिवर्सिटी येथे होणार्‍या अभ्यास दौर्‍यासाठी निवड करण्यात आली होती. सदर अभ्यास दौर्‍याचे उद्ष्टि महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व वॉशिंग्टन स्टेट युनिवर्सिटी, अमेरीका दरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणे व तेथे असणार्‍या हवामान अद्ययावत आधारीत कृषि अभ्यासक्रमाची माहिती जाणून घेणे होते.

सदर अभ्यासक्रम वरील नमुद केलेल्या कालावधीत न होता तो वॉशिंग्टन स्टेट युनिवर्सिटी, अमेरीका यांच्या विनंतीने 6 ते 14 मार्च 2020 असा बदल करण्यात आला. सदर अभ्यासक्रम दौर्‍यासाठी वरील नमुद विद्यापीठाचे दोघे अधिकारी 6 मार्चला मुंबईहुन सीएटल, अमेरीका येथे रवाना झाले. तेथून ते वॉशिंग्टन स्टेट युनिवर्सिटी, अमेरीका, पुलमन व प्रोसर येथील कॅम्पस या दौर्‍यात हे कोणत्याही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादात सहभागी झाले नाही. या दौर्‍यात अथवा प्रवासात त्यांनी कोणत्याही कोरोनाग्रस्त रुग्णास पाहिले नाही.

14 मार्च रोजी दोन्ही अधिकार्‍यांनी सीएटल, अमेरीकेहुन मुंबईकडे येण्यासाठी प्रस्थान केले. हे दोघेही 16 मार्च रोजी परदेशातून मुंबई विमान तळावर उतरले. यानंतर त्यांची विमानतळावर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. परंतु हातावर कोणताही होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेला नव्हता तसेच होम क्वारंटाईनबद्दल त्यांना सूचना दिल्या नव्हत्या. 17 मार्चला कुलगुरु व अधिष्ठाता यांची अहमदनगर रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यांना दि. 17 ते 19 मार्च 2020 पर्यंत रुग्णालयात विलनीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ते परत विद्यापीठात आले. विद्यापीठात आल्यापासून ते दोघेही होम क्वारंटाईनमध्ये आहेत. देशात आल्यापासून ते आजतागायत त्यांनी कोणत्याही प्रकारचा सत्कार स्विकारला नसून कोणत्याही कार्यक्रम/बैठका यांना हजर राहिलेले नाहित व स्वतःहून होम क्वारंटाईनमध्ये आहेत असा खुलासा कुलगुरु व अधिष्ठाता यांनी केला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!