Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू ; मृतांची संख्या 50 वर

पुण्यात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू ; मृतांची संख्या 50 वर

 सार्वमत

पुणे (प्रतिनिधि) – पुण्यामध्ये शुक्रवारी दिवसभरात कोरोंनाबाधित आणखी चार रुग्णांचा मृत्यू झाला. तर आणखी 59 नवीन कोरोंनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. करोनाबाधीत चार मृतांमध्ये 65 वर्षांची महिला, 30 वर्षाचा तरुण आणि 44 वर्षांच्या पुरुषाचा समावेश आहे. मृत व्यक्तींना विविध आजार होते. त्यात करोनाची बाधा झाल्यानंतर अवयय निकामी झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील मृतांची संख्या 50 झाली आहे..
पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुण्यात आज (17 एप्रिल) सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाचपर्यंत 22 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 531 पर्यंत पोहोचली आहे.यातील 446 रुग्ण हे पुणे शहरातील आहेत. तर 49 रुग्ण हे पिंपरी चिंचवड आणि 36 रुग्ण हे पुणे ग्रामीण भागातील आहेत.

- Advertisement -

दरम्यान पुण्यातील भवानी पेठेत कालच्या दिवसात तब्बल 22 नवे रुग्ण सापडले आहेत. भवानी पेठ परिसरात सातत्याने कोरोना रुग्ण आढळत असल्याने इथली रुग्णसंख्या सर्वाधिक राहिली आहे. आतापर्यंत इथे 118 रुग्ण सापडले असून 15 रहिवाशांचा कोरोनाफमुळे बळी गेला आहे.
आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील हवेली, शिरुर, बारामती, भोर, वेल्हे, मुळशी आणि जुन्नर या सात तालुक्यात कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर उर्वरित इंदापूर, मावळ, दौंड, खेड, पुरंदर आणि आंबेगाव या सहा तालुक्यात अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही.

त्यामुळे ग्रामीण भागात अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. भोर आणि पुरंदर या दोन तालुक्यात बारामती पॅटर्नफ राबवायला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर अद्यापही सर्वाधिक आहे. राज्यातील मृत्यूदर 6.41 टक्के आहे, परंतु पुण्यातील कोरोनाफग्रस्तांचा मृत्यूदर दहा टक्क्यांच्या आसपास आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोनाफबळी मुंबईत गेले असले, तरी रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक मृत्यू पुण्यात आहेत. रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण पाहिल्यानंतर राज्यात सर्वाधिक म्हणजे 9.3 टक्के मृत्यूदर पुण्यात असल्याचं दिसून येतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या