Monday, April 29, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात चार करोनाबाधितांंचा मृत्यू

पुण्यात चार करोनाबाधितांंचा मृत्यू

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यात सोमवारी सकाळपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 4 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दोन पुरुष आणि दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. हे चारही रुग्ण ससून रुग्णालयात उपचार घेत होते. पुण्यात आतापर्यंत 105 रुग्णांचा मृत्यू झाला असून तर पुणे जिल्ह्यातील मृत्यू पावलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या 115 वर पोहोचली आहे.
यातील तिन्ही मृत रुग्ण हे 60 वर्षे वयोगटाच्या पुढील आहे. तर एका करोनाबाधित मृताचे वय हे 50 आहे. पुण्यात आज झालेल्या करोना रुग्णांच्या मृत्यूंमध्ये दोन जण हे येवला परिसरातील आहेत.

- Advertisement -

पुणे जिल्हयातील करोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 103 झाली आहे. 499 करोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 1 हजार 489 आहेत. पुणे जिल्हयात करोनाबाधीत एकूण 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 83 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणा खाली आहेत.

दरम्यान, पुणे विभागातील 558 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात करोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 364 झाली आहे. तर क्टीव रुग्ण 1 हजार 681 आहेत. विभागात करोनाबाधीत एकुण 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 86 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात 2 हजार 364 बाधित रुग्ण असून 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 2 हजार 103 बाधीत रुग्ण असून 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 78 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 135 बाधीत रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 34 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 14 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागात 23 हजार 942 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 22 हजार 823 चा अहवाल प्राप्त आहे. 1 हजार 119 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 20 हजार 393 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 2 हजार 364 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या