Friday, April 26, 2024
Homeदेश विदेश78 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसांत करोनाचा नवा रुग्ण नाही – आरोग्य मंत्रालय

78 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसांत करोनाचा नवा रुग्ण नाही – आरोग्य मंत्रालय

सार्वमत

नवी दिल्ली – गेल्या 28 दिवसांत देशातील 12 जिल्ह्यांमध्ये करोना व्हायरसचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. तर गेल्या 14 दिवसांत देशातील एकूण 78 जिल्ह्यांमध्ये एकाही व्यक्तीला करोना व्हायरसची लागण झाली नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी गुरुवारी दिली.

- Advertisement -

दरम्यान देशातील वेगवेगळया राज्यांमध्ये मोठया प्रमाणावर करोनाच्या चाचण्या सुरु आहेत. त्यामुळे नेमकी किती लोकांना करोनाची लागण झाली आहे ते समोर येत आहे. मागच्या 24 तासांत देशात 1409 नागरिकांचे करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला देशात एकूण 21,393 करोनाग्रस्त रुग्ण आहेत. तर 681 लोकांचा आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात 16 हजार 454 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

तर 4257 करोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमेरिका आणि युरोपियन देशांच्या तुलनेत भारतात करोना बाधितांची संख्या कमी आहे. भारताने वेळीच उपायोजना केल्यामुळे हे शक्य झाले असेही ते म्हणाले.

देशात लॉकडाऊन जाहीर होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. या महिनाभरात देशात जवळपास पाच लाख करोनाच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. सध्या जास्तीत जास्त टेस्ट करण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत केलेल्या पाच लाख टेस्टमध्ये जवळपास 21 हजार लोक करोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे. यादरम्यान करोना व्हायरसचा ट्रान्समिशन आणि डबलिंग रेट कमी करण्यात शासनाला यश आहे.

रुग्णालयात दाखल होण्याची वेळ कुणावर येऊन नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र हे तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा सोशल डिस्टन्सिंगचं पालक लोक करतील. मात्र रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. आज देशात 736 रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णावर उपचार केले जात आहे. या रुग्णालयामध्ये एकूण 1 लाख 94 हजार बेड्सची व्यवस्था आहे असे लव अग्रवाल यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या