Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

…तर देशात असते करोनाचे 8 लाख रुग्ण – आरोग्य मंत्रालय

Share
78 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसांत करोनाचा नवा रुग्ण नाही - आरोग्य मंत्रालय coronavirus-no-fresh-cases-in-78-districts-in-last-14-days-health-ministry-information

नवी दिल्ली – देशात लॉकडाऊन नसता तर करोनाचे 8 लाख रुग्ण असते अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. भारताने इतर देशांच्या तुलनेत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली असून योग्य वेळी निर्णय घेण्यात येत आहेत. देशात लॉकडाऊन घोषित केला नसता आणि प्रादुर्भाव असलेल्या भागांना वेळेवर सील केले नसते तर करोना रुग्णांची संख्या आताच्या घडीला 8 लाखांवर पोहोचली असती.

41 टक्क्यांच्या वाढीने 15 एप्रिलपर्यंत देशात 8 लाखाहून अधिक रुग्ण झाले असती, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. देशात फक्त करोनासाठी 586 रुग्णालय तयार करण्यात आलेत. या रुग्णालयांमध्ये 1 लाख बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, असं अग्रवाल यांनी सांगितलं.

डॉक्टर, हॉस्पिटल स्टाफ आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना पोलीस संरक्षण पुरवण्याचे आदेश राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. क्वारंटाइन असलेल्या रुग्णांसाठी सेवा देणार्‍या वैद्यकीय सेवेतील कर्मचार्‍यांनाही सुरक्षा देण्यात यावी, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पी.एस. श्रीवास्तव यांनी दिली.

रुग्ण संख्या 7447 वर – देशातील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढून 7447 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1035 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 239 जणांचा देशात करोनाने मृत्यू झाला आहे. करोनाच्या 642 रुग्णांवर यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

कोरोनाप्रभावित राज्यांमध्ये केंद्राचे विशेष पथके – आरोग्य मंत्रालय

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!