Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात येणार केंद्रीय सशस्त्र पोलीस दल

पुण्यात येणार केंद्रीय सशस्त्र पोलीस दल

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखता यावा आणि लॉकडाऊनचं पालन केलं जावं यासाठी पुण्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची तुकडी येणार आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची एक तुकडी पुण्यात पुणे पोलिसांच्या मदतीसाठी येणार आहे. या तुकडीत दहा अधिकारी आणि 110 जवान असणार आहेत.

- Advertisement -

पुण्यात सध्या 69 प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) असून या भागासह इतर ठिकाणी पोलिसांच्या मदतीला सीआरपीएफ असेल. नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची मागणी केली होती. त्यानुसार, पुणे पोलीस दलाला 120 जवानांची एक तुकडी मदतीला येणार आहे. सातत्यानं ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर ताण आला आहे. त्यामुळे पुण्यात येणार्‍या सीआरपीएफच्या तुकडीने पोलिसांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या