Friday, May 3, 2024
HomeनगरCOVID19 : जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णसंख्येत घट

COVID19 : जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णसंख्येत घट

अहमदनगर | Ahmednagar

गुरूवारी जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा 2 हजारांच्या आत आल्याने दिलासा मिळाला. मात्र, गेल्या 24 तासांत करोना मृतांच्या संख्येत 63 ची भर पडल्याने जिल्ह्यात आतापर्यंतच्या करोना बळींची संख्या 3 हजार 32 झाली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात काल 2 हजार 572 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोना मुक्त झालेल्यांची संख्या 2 लाख 40 हजार 950 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 93.83 टक्के झाले आहे. दरम्यान, काल नव्याने 1 हजार 610 करोना रुग्ण वाढले असून यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 12 हजार 805 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 201, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 738 आणि अँटीजेन चाचणीत 671 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 8, अकोले 56, जामखेड 1, कोपरगाव 11, नगर ग्रामीण 20, नेवासा 15, पारनेर 3, पाथर्डी 29, राहता 5, राहुरी 20, संगमनेर 16, श्रीगोंदा 13, श्रीरामपूर 1 आणि इतर जिल्हा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 79, अकोले 14, जामखेड 61, कर्जत 41, कोपरगाव 55, नगर ग्रामीण 45, नेवासा 105, पारनेर 22, पाथर्डी 10, राहाता 26, राहुरी 77, संगमनेर 61, शेवगाव 82, श्रीगोंदा 9, श्रीरामपूर 41, कँटोन्मेंट बोर्ड 2 आणि इतर जिल्हा 08 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 671 जण बाधित आढळुन आले. मनपा 25, अकोले 52, जामखेड 20, कर्जत 30, कोपरगाव 57, नगर ग्रा. 25, नेवासा 67, पारनेर 65, पाथर्डी 47, राहाता 55, राहुरी 29, संगमनेर 50, शेवगाव 41, श्रीगोंदा 51, श्रीरामपूर 53, कँटोन्मेंट बोर्ड 1 आणि इतर जिल्हा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, बुधवारी करोनाबळींची संख्या 2 हजार 969 होती. त्यात 63 ने वाढ झाल्याने करोना मृतांचा आकडा आता 3 हजार 32 झाला आहे.

27 दिवसांत 1 हजार बळी

जिल्ह्यात 1 मे रोजी करोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या 2 हजार 30 होती. हिच संख्या पुढील 27 दिवसांत 3 हजार 32 झाली आहे. याचा अर्थ जिल्ह्यात गेल्या 27 दिवसांत 1 हजार 1 रुग्ण करोनामुळे मृत पावलेले आहे. जिल्ह्यात करोनाचे सर्वात भयावह स्थिती मे महिन्यांत असल्याचे दिसत आहे. मे महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात करोना बाधित होण्याचे प्रमाण हे 44 टक्के होते. यावरून जिल्ह्यातील करोना संसर्गाच्या स्थितीचा अंदाज आल्या शिवाय राहत नाही. मात्र, लॉकडाऊनमुळे करोना संसर्गाचा हा आकडा महिन्यांच्या अखेरीस 11 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

नेवासा 187, संगमनेर 127, राहुरी 126, कोपरगाव 123, शेवगाव 123, अकोले 122, नगर मनपा 112, श्रीरामपूर 95, पारनेर 90, नगर ग्रामीण 90, राहाता 86, पाथर्डी 86, जामखेड 82, श्रीगोंदा 73, कर्जत 71, अन्य जिल्हा 14, भिंगार 3, लष्कार आणि अन्य राज्य शुन्य.

- Advertisment -

ताज्या बातम्या