Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

मुंबईत कोरोनाचा तिसरा बळी; चिंता वाढली

Share

मुंबईत कोरोनामुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात देशातील सर्वाधिक रुग्ण असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आजच्या माहितीनुसार कोरोनाचे राज्यात आणखी १५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ८९ वर पोहोचली आहे.

नवी मुंबई येथील राहणारे ६८ वर्षीय वृद्ध फिलीपाइन्समधील असल्याचे समजते. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचार सुरू असतानाच रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले.  या व्यक्तिचा करोनाचा प्राथमिक रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

त्यानंतर त्याचा रिपोर्ट पुन्हा निगेटिव्ह आला होता. सुरुवातीला त्याला कस्तुरबा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.

तिथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तिला दम्याचा आणि मधुमेहाचा त्रास होता. करोनाची लक्षण आढळल्याने त्याला १३ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!