Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे विभागात 673 रुग्ण कोरोनामुक्त

पुणे विभागात 673 रुग्ण कोरोनामुक्त

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुणे विभागातील 673 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 574 झाली आहे. तर क्टीव रुग्ण 1 हजार 764 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 137 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 93 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

- Advertisement -

यापैकी पुणे जिल्हयातील 2 हजार 287 बाधीत रुग्ण असून 608 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेलेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 1 हजार 555 आहे. कोरोनाबाधित एकूण 124 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 86 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्हयात 92 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 145 बाधीत रुग्ण असून 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 35 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 15 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 26 हजार 326 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 25 हजार 4 चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 322 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 22 हजार 106 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 2 हजार 574 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या