पुण्यात आज करोनाने 14 रुग्णांचा मृत्यू

jalgaon-digital
3 Min Read

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यातील करोनाची तीव्रता वाढत असून मृत्युच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी पुण्यामध्ये आतापर्यंत सर्वाधिक 14 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाल्याने पुणेकरांची चिंता आणखीनच वाढली आहे. दिवसभरात 152 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून 113 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 165 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 43 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3899 इतकी झाली आहे. पुण्यातील क्टिव्ह रुग्ण संख्या 1656 इतकी आहे. बुधवारपर्यंत एकूण 2023 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी 1507 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

दरम्यान, संध्याकाळी सहापर्यंत पुणे विभागातील 2 हजार 475 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात करोना बाधीत रुग्णांची संख्या 5 हजार 347 झाली आहे. तर अ‍ॅक्टीव रुग्ण 2 हजार 607 आहेत.

विभागात करोनाबाधीत एकुण 265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 187 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 4 हजार 525 बाधीत रुग्ण असून करोना बाधित 2 हजार 184 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 114 आहे. करोनाबाधित एकूण 227 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 178 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधीत रूग्णाच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रूग्णाच्या संख्येमध्ये पुणे जिल्हयात 245 ,सोलापूर जिल्हयात18,कोल्हापूर जिल्हयात53, सांगली जिल्हयात 7 व सातारा जिल्हयात 28अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील 166 करोना बाधीत रुग्ण असून 76 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 87 आहे. करोनाबाधित एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 461 करोना बाधीत रुग्ण असून 168 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 261 आहे. करोना बाधित एकूण 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील 59करोना बाधीत रुग्ण असून 34 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 24 आहे. करोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 136 करोना बाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 121 आहे. करोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वंदे भारत मिशन अंतर्गत विभागामध्ये अत्तापर्यंत परदेशामधून 476 प्रवाश्यांचे आगमन झाले आहे. यापैकी पुणेजिल्हयात 372, सोलापूर जिल्हयात 18 ,कोल्हापूर जिल्हयात 29 , सातारा जिल्हयात 22 व सांगली जिल्हयात 35 प्रवाशी आले आहेत.विभागातून 5 हजार 876 बसद्वारे 76 हजार404 प्रवासी बाहेर गेले आहे. तसेच 294 बसद्वारे 5 हजार 832 प्रवासी विभागात आले आहेत, असेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *