Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रससून रुग्णालयात आतापर्यंत 106 करोना रुग्णांचा मृत्यू

ससून रुग्णालयात आतापर्यंत 106 करोना रुग्णांचा मृत्यू

सार्वमत

पुणे – ससून रुग्णालयामध्ये करोनामुळे मृत्यू होणार्‍ंयाची संख्या वाढतच आहे. रविवारी आणखी 3 जणांचा करोनामुळे बळी गेला. आतापर्यंत या रुग्णालयात 106 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 112 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

रविवारी कसबा पेठेतील 72 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 70 वर्षीय महिलेचा, धनकवडीतील 72 वर्षीय पुरुषाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णांना करोना व्यतिरिक्तही निमोनिया आणि इतर आजार होते, अशी माहिती सुसून रुग्णालयाच्या प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

तर पुणे शहरात करोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या 190 च्या आसपास गेली आहे. त्यामध्ये एकट्या ससून रुग्णालयातच शंभरपेक्षा जास्त करोनाचे बळी गेले आहेत. सातत्याने मृत्यूदर जास्त असल्याने तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बदली करण्यात आली. त्यानंतरही मृत्यू काही थांबताना दिसून येत नाही. या रुग्णालयाची जबाबदारी जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

गंभीर रुग्णांना केले जाते दाखल – दरम्यान ससूनमध्ये गंभीर स्थितीतील रुग्णांना दाखल केले जाते. करोनामुळे मृत्यू होणार्‍या रुग्णांना किडनी विकार, निमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब असे अनेक आजार असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे 60 ते 80 वयोगटातील जेष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या