Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशकरोना : महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती – केंद्रीय आरोग्य मंत्री

करोना : महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती – केंद्रीय आरोग्य मंत्री

सार्वमत

36 पैकी 34 जिल्ह्यांना फटका
नवी दिल्ली – महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 34 जिल्ह्यांत करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याची स्थिती चिंताजनक आहे. राज्यात होत असलेला करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पुढे काय करता येईल, यासंदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक बोलावणार आहोत. त्या बैठकीत आगामी नियोजनासंदर्भात कृती धोरण ठरवलं जाईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं.

- Advertisement -

देशात करोनाचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर झाला आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्रातील संख्या तब्बल 15 हजार 525 इतकी आहे. यापैकी 2 हजार 819 इतके रुग्ण बरे झाले आहेत. तर 617 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईत तब्बल 10 हजार जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे.

तर पुण्यातील आकडा 2 हजारांच्या पुढे गेला आहे. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांपैकी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, सोलापूर येथील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून एकही नवीन रुग्ण आढळू नये यासाठी प्रयत्न करू. यासाठी महाराष्ट्र सरकारला हवी ती मदत केंद्राकडून केली जाईल, असं हर्षवर्धन म्हणाले.
महाराष्ट्रात करोनाचे जवळपास 1026 कंटेन्मेंट झोन झाले आहेत. केंद्र सरकारचं वैद्यकीय पथक आणि डॉक्टर्स मुंबईत आहेत. महाराष्ट्र सरकारला आवश्यक मदत केली जाईल, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या