Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कोरोना व्हायरस : आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १८ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल

Share

नाशिक  | प्रतिनिधी

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र जमावबंदी, आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. याकाळात काही व्यावसायिकांवर आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नाशिकमध्ये जमावबंदी, रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. याबाबतची नियमावली सर्वत्र सादर करण्यात आली असतानाही अनेक व्यावसायिकांनी आदेशाचे  पालन न करता दुकान सुरु ठेवले.

भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत १८ व्यावसायिकांनी त्यांचे व्यवसाय चालु ठेवले होते. सदरचे व्यावसायिक हे अत्यावश्यक सेवा पुरविणारे नसल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले. त्यानंतर या व्यावसायिकांवर आदेशांचे उल्लंघन केल्याने नमुद १८ व्यावसायिकांवर भारतीय दंडसंहिता १८६० चे कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात आलेल्या आहेत.

संपुर्ण नाशिक शहर व जिल्हाभर सीआरपीसी कलम १४४ अन्वये संचारबंदी लावण्यात आलेली आहे. तरी कुणीही नागरीकांनी घराबाहेर पडु नये तसेच व्यवसाय थाटू नये असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे व भद्रकाली पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!