करोनाच्या धसक्याने मटण-मासे विक्रीत घट; खवय्यांनी मांसाहाराकडे फिरवली पाठ

करोनाच्या धसक्याने मटण-मासे विक्रीत घट; खवय्यांनी मांसाहाराकडे फिरवली पाठ

नाशिक । खंडू जगताप

चीनमध्ये ’कोरोना’ विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या विषाणूची दहशत अवघ्या जगात पसरली आहे. हा विषाणु मांस खाल्ल्याने पसरत असल्याचा मुद्दा पकडून सोशलमिडीयावरून विविध एसएमस व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. याचा धसका घेत मांसाहार करणार्‍यांपैकी बहूतेकांनी चिकण, मटण तसेच माशांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. यामुळे शहरासह जिल्ह्याभरात मटण – मच्छीच्या मागणीत 40 टक्केपक्षा अधिक घट झाल्याचे समोर येत आहे.

चीन मध्ये कोरोना विषाणुने शेकडो लोकांचे प्राण घेतले आहेत. या विषाणुचे उगमस्थान वटवाघुळात असून याचे वाहक इतर प्राणी असल्याचे संशोधणातून समोर येत आहे. मात्र याबाबत खात्रीशिर अशी कोणतेही माहिती प्रसारीत झालेली नाही. जागतिक आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक काळजी घेण्यासाठी काही सुचना केल्या आहेत. ज्या राज्याच्या आरोग्य यंत्रणेने प्रसिद्ध केल्या आहेत. यामध्ये स्वच्छतेची काळजी घेण्यासह इतर सुचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये कच्चे अथवा अर्ध कच्चे मांस खाणे टाळावे अशी सुचना करण्यात आली आहे.

याचा आधार घेत व्हाट्सअ‍ॅप तसेच इतर सोशल साईटवर नेटझंसनी सर्व प्रकारचे मांसांसाठी मारले जाणारे प्राणी, कोंबड्या, मासे यांची रोगटलेली छायाचित्र टाकून यांमधून कोरोना विषाणु पसरत असल्याने मटण, चिकण तसेच मासे खाऊ नयेत असे आव्हान केले जात आहे. ’कोंबडीला कोरोनाची बाधा, चिकन खाणे टाळा’ अशा मथळ्याखाली सोशल मिडियात एसएमस फिरत आहेत.

याच्या परिणामी अनेकांनी मांसाहाराचा धसका घेतला असून कुटुंबा कुटुंबातून मांसाहार बंदींची फरमाने निघत आहेत. अनेक लोक नातेवाईकांना दुरध्वनीवरून मांस न खाण्याच्या सुचना देत आहेत. वडिलधारी मंडळी मुलांना काही दिवस मांसाहार पुर्ण बंद करण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. तर चौकांमध्ये याची मोठी चर्चा असून जो तो एकमेकांना मांसाहार न करण्याची सुचना देत आहेत.
या सर्वाचा परिणाम जिल्हाभरातील चिकण, मटण तसेच मासे विक्रीवर झाला आहे. अचानकमणे 40 ते 45 टक्के मागणीत घट झाली आहे. यामुळे दरही कमी झाले आहेत. यामुळे मांस, चिकण, मासे विक्रेते व्यापारी चिंताग्रस्त झाले आहेत. याचा पुढील परिणामी पोल्ट्री तसेच मच्छ उद्योगावर दिसून येणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या प्रकरणी पशुवैदकीय अधिकार्‍यांनी सांगीतले की, भारतामध्ये सध्या अशी कुठलीही घटना झालेली नाही ज्यामध्ये असा विषाणू कुठल्याही कोंबडी किंवा तत्सम प्राण्यात आढळलेला नाही. सध्या समाज माध्यमांतून जे संदेश पोहचवले जात आहेत ते चुकीचे आहेत. कोबंड्यांचे जे फोटो व्हायरल होत आहेत, तो कोरोना विषाणू नसून ’राणीखेत’ तसेच बर्डफ्लू नावच्या रोगाची लक्षणे दिसत आहे. भारतात अशा प्रकारे मृत्यू कोणाचाही मृत्यू झालेला नाही, त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही.

मागणीत घट

नागरीकांनी चीनमध्ये सुरू असलेल्या कोरोना विषाणुचा धसका घेततला आहे. हा मांसामुळे होतो अशा अफवा पसरत असल्याने गेली पाच ते सहा दिवसात चिकण, मटण तसेच मासे विक्रती मोठी घट झाली आहे. आमच्या चिकण विक्रीत ही घट 40 ते 50 टक्के दरम्यान आहे. दर कमी करूनही लोक घेण्यास टाळाटाळ करत आहेत. यामुळे आमचे नुकसान होत आहे.                                                                    – समीर खान, चिकण व्यापारी

सुचना कच्चे मांस न खाण्याची

जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सुचनांमध्ये कोणत्याही प्रकारचे मांस कच्चे तसेच अर्धकच्चे खाऊ नये अशी सुचना आहे. कोणाताही विषाणु हा 35 ते 45 डीग्री तापमाणात मरून जातात. मुळात आपली मांस शिजवून खाण्याची पद्धत आहे. एखादे मांस 100 डिग्री सेल्सियसवर उकळल्यावर त्यातले जीव-जंतु मरून जातात. यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.                                                        – डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सक

विषाची परिक्षा कशाला?

सर्वत्र मांसाहारमुळे कोरोना पसरतो असे मॅसेज व्हॉटसअ‍ॅप ग्रुप, फेसबुकवरून प्रसारीत होत आहेत. भयंगर चित्र दिसत आहे. अनेकजन चिकण, मटण चांगले शिजवल्यामुळे भिती नसल्याचे सांगत आहेत. परंतु चीन मध्ये उडालेला हाहाकार पाहता विषाची परिक्षा कशाला घ्यायची. यामुळे सर्व कुटुंबाने मांसाहार न करण्याचे ठरवले आहे.                                                                                                    – अशोक पाचोरकर, नागरीक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com