Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोना : देशात ६९४ रुग्ण तर महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १२५ वर

कोरोना : देशात ६९४ रुग्ण तर महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १२५ वर

नवी दिल्ली |  वृत्तसंस्था

देशभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरु आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. देशभरात गेल्या 24 तासांत 40 पेक्षा जास्त नवीन कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत.

- Advertisement -

तर 24 तासात चार कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहे. देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांना वारंवार घरात राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 694 वर पोहोचली आहे. तर देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 125 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

तर आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे देशभरात आतापर्यंत 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत 3243 जणांना भरती करण्यात आले. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 2750 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 125 जण पॉझिटिव्ह आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यात कुठे किती रुग्ण?

पिंपरी चिंचवड मनपा 12

पुणे मनपा 18

मुंबई 49

सांगली 9

नवी मुंबई , कल्याण डोंबिवली 6

नागपूर 5

यवतमाळ 4

अहमदनगर, ठाणे प्रत्येकी 3

सातारा, पनवेल प्रत्येकी 2

उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार, पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग प्रत्येकी १

एकूण 125

मृत्यू 4

- Advertisment -

ताज्या बातम्या