Type to search

Breaking News Featured नाशिक ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : कोरोना, कर्फ्यु आणि दोन प्राण्याचा जीव.. शेवटपर्यंत आठवणीत राहतील

Share
Blog : कोरोना, कर्फ्यु आणि दोन प्राण्याचा जीव.. शेवटपर्यंत आठवणीत राहतील, corona virus curfew and two animals
घोडा आणि लांडोर लढाई हरले…आपली लढाई सुरू आहे .. कोरोनाशी.. सरकार आवश्यक ती पावलं उचलतय आणि आपण सगळे त्याला साथ द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करत  आहोत. मात्र, काही महाभाग त्यालाही हरताळ फासताय हेही आपण बघतोय.. “कर्फ्यु ” बाहेर जाणं बंद .. म्हणून घरातच आहे 4 दिवसापासून..
अत्यावश्यक कामालाही जाणं टाळतोच… त्यातच दोन फोन, दोन वेगवेगळ्या घटना, वेगवेगळ्या वेळेला, वेळेत उपचार  न मिळाल्याने…एक घोडा आणि एक लांडोर ..दोघेही हरले जीवनाची लढाई ..
चांदवड नजीकच्या देवळा सटाणा या रस्त्याला जोडणारा भाबडबारी घाट तेथे एक घोडा तडफडत पडलेला असल्याचा सुनील बनसोडे यांचा फोन आला.
चांदवडकडे लगेच पोहचणे शक्य नसल्याने आणि त्यांना ही सरकारी अधिकारी असल्याने कामावर वेळेत पोहचणे महत्वाचे होते. त्यामुळे तिथे थांबणे शक्य नव्हते.  पण त्यांनी मला फोन करून घटनेची महिती दिली.
तिथे पोहचणे शक्य नव्हते त्यात कर्फ्यु काय करावं काही सुचेना ..  तिथे कोणी जवळच माणूस जाऊन योग्य ती गोष्ट आपल्याला करता येईन.. या उद्देशाने  तिथे जवळच राहणारे माझे मेहुणे खंडू नानाजी भदाणे याना फोन करून त्या ठिकाणी जाऊन घोड्याला मदत करत येईन की काय ते बघून मला सांगा .. तेही परशराम भदाणे याना सोबत घेऊन तातडीने त्या ठिकाणी त्यांच्या घरापासून 20 25 किलोमीटर पुढे पोहचले.. घोड्याची शोध मोहीम झाली .. टोल नाक्याच्या जवळ 100 ते 150 फुटावर उजव्या बाजूस घोडा पडलेल्या स्थितीत होता .. पण त्याने जीव सोडल्याचं त्यांनी सांगितलं..

दुर्दैव .. आम्हाला त्याला पाणीही पाजता आलं नाही, हे त्यांचं वाक्य मनाला चटका लावून गेलं.. पण तरीही या रोगराईच्या पार्श्वभूमीवर तो तिथे पडून राहणं योग्य नव्हतं .. म्हणून चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल याना फोन केला घटना आणि स्थळ सांगितलं.. मृत घोड्याची व्यवस्था लावावी म्हणून विनंती केली. त्यांनी महामार्ग प्रशासनाला घटना कळवून योग्य ती व्यवस्था केली .. त्याबद्दल त्यांचे व भदाणे द्वयींचे मानावे तेव्हढे आभार कमीच आहेत..

दुसऱ्या घटनेत मला माझे मोठे भाऊ नंदूभाऊ कदम यांच्या फोन आला की, आमचे पुतणे स्वप्नील कदम यांच्या घराच्या मागे  मनोहर गार्डन गेट जवळ एक मोठा पक्षी कदाचित मोर असावा पडून जखमी झाला आहे.

मी तडक उठून बाहेर पडलो.. पक्षी आजूबाजूच्या मित्रपरिवाराने रस्त्यातून बाजूला घेतला.. मी गेलो तेंव्हा तिथे गर्दी जमा झाली होती .. सर्वाना विनंती केली की , गर्दी करू नका सरकारच्या आदेशाचे पालन करा .. सर्वांनी सहकार्य केले.. पक्षी लांडोर होती ..

अतिशय सुंदर पक्षी बघून मन हेलावले .. पक्ष्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला पण तो पर्यंत पक्ष्याची प्राणज्योत मावळली होती.. वरच्या 11 केव्ही वायरचा स्पर्श झाल्याने विजेच्या जोरदार झटक्याने त्याचा मृत्यू झाला होता.. आता प्रश्न त्याला असा ठेवता येणं शक्य नव्हतं .. करण त्याला बघण्यासाठी गर्दी होऊन कलाम 144 संचारबंदीच उल्लंघन होऊ शकतं..

त्यात लांडोर हा पक्षी वन्यजीव कायदा 1972 प्रमाणे सूची 4 मध्ये येत असल्याने आपण स्वतः त्याला पुरणे हेही चुकीचेच .. म्हणून वन अधिकारीश्री गोसावी साहेब यांना फोन करून घटनेची माहिती दिली.. कर्फ्यु असल्याने येण्यास किती वेळ लागेल सांगता येत नाही पण लगेचच निघतो असं म्हणून अर्धा तासात ते पोहचलेही..

त्यांनी पक्षी ताब्यात घेतला आणि माझ्या कामाचं कौतुक केले. पक्ष्याच्या इतर बाबीबद्दल तसेच लोकांना वन्यजीव कायदा आणि पक्षी प्राण्याबद्दल माहिती व्हायला हवी जेणेकरून त्यांना काय भूमिका घ्यायला हवी हे कळू शकेल यावर प्रकाश झोत टाकून ते पक्षी ताब्यात घेऊन निघाले..

घोडा आणि लांडोर पक्षी वाचले नसले तरी त्यासाठी वेळ देऊन प्रयत्न करणारे सर्वांसोबतच गर्दी न करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कलम 144 चे गांभीर्य ठेवणारे ज्यभवानी रोड, कदम नगर , मनोहर गार्डन , लौटे नगर व त्रंबक नगर परिसरातही सर्व नागरिक व माता भगिनींचे मनापासून आभार..

कोरोना व्हायरस मुळे लोक किड्या मुंग्यांसारखे मरत असताना .. जगावर संकट आलेलं आहे .. आपले केंद्र आणि राज्य सरकार योग्य ते पावलं उचलत आहे .. आपण सर्वांनी जबाबदारीने वागले पाहिजे …

परिस्थितीचे गांभीर्य ओळखायला पाहिजे.. त्यासाठी काय काय उपाय योजना करता येतील आणि सरकारला नवीन काही देता येईन का ? यासाठी प्रयत्न करत असताना,

दोन गोड ,सुंदर प्राण्यांचा अंत व्हावा त्यांच्यासाठी आपल्याला काहीही करता आलं नाही हे दुःख निश्चितच कायमस्वरूपी राहीन.. कोरोना , कर्फ्यु आणि दोन प्राण्याचा जीव .. शेवटपर्यंत आठवणीत राहतील हे नक्की!

  • विक्रम कदम, लेखक सामाजिक कार्यकर्ते आणि ब्लॉगर आहेत.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!