Saturday, April 27, 2024
Homeनाशिककरोना टेस्टिंग लॅबमध्ये आजपासून स्वॅब तपासणी; दररोज किती नमुने तपासणार? जाणून घ्या

करोना टेस्टिंग लॅबमध्ये आजपासून स्वॅब तपासणी; दररोज किती नमुने तपासणार? जाणून घ्या

नाशिक । प्रतिनिधी

डाॅ.वसंत पवार मेडिकल महाविद्यालयातील करोना टेस्टिंग लॅबला  युजरनेम व पासवर्ड मिळाला असून मंगळवारी (दि.२८) दुपारी पहिला स्वॅब टेस्टिंगसाठी घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे  यांनी दिली.

- Advertisement -

एका मशीनवर एका दिवसात 180 स्वॅब तपासण्याची सुविधा प्राप्त झालेली आहे.  दुसरे मशीनचे कॅलिब्रेशन करून ही क्षमता 360 वर नेली जाणार आहे.

गेल्या पंधरा दिवसात जिल्हा प्रशासनाने अथक प्रयत्न करून व अनेक अति क्लिष्ट बाबींची पूर्तता केली. त्यामुळे टेस्टिंग लॅबमध्ये स्वॅब तपासणीचा मार्ग मोकळा झाला असुन  नाशिकमधील संशयितांचे करोना निदान त्वरीत होण्यास मदत मिळणार आहे.

नाशिकमधील करोना संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे व धुळे येथील वैदयकिय महाविद्यालयातील लॅबमध्ये पाठवले जात आहेत.  या ठिकाणी इतर जिल्ह्यातुनही नमुने तपासणीसाठी येतात. त्यामुळे नाशिकमधील रुग्णांचे अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत होता.

त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येच स्वॅब तपासणी लॅब सुरु व्हावी यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हा प्रशासन प्रयत्नशील होते. या प्रयत्नांना यश आले असून डाॅ.वसंतराव पवार वैद्यकिय महाविद्यालयातील लॅबमधील स्वॅब तपासणीचा मार्ग मोकळा झाला अाहे.

आरोग्य मंत्रालयाने त्यास मान्यता दिली आहे. शहरातील दातार जनेटिक्स व अपोलो हाॅस्पिटलने स्वॅब तपासणीचे कीट व यंत्र मोफत उपलब्ध करुन दिले आहे. डाॅ.पवार वैद्यकीय महाविद्यालय व दातार जनेटिक्सचे तज्ज्ञ डाॅक्टरांचे पथकाने नागपुरमधील एम्समध्ये स्वॅब नमुने तपासणीचे प्रशिक्षण घेतले आहेत. तसेच स्वॅब तपासणीसाठी आवश्यक कीट देखील उपलब्ध झाले.

लॅबला युजरनेम पासवर्ड मिळण्याची प्रक्रिया पुुर्ण झाली आहे. आज दुपारी आपण पहिला स्वॅब टेस्टिंगसाठी घेत आहोत.  एका मशीनवर एका दिवसात 180 स्वाब तपासण्याची सुविधा आपल्याला प्राप्त झालेली आहे.  दुसरे मशीनचे कॅलिब्रेशन करून आपणही क्षमता 360 वर नेणार आहोत.  गेल्या पंधरा दिवसात अथक प्रयत्न करून व अनेक अति क्लिष्ट बाबींची पूर्तता करून आपण शेवटी लॅब सुरू करण्याच्या टप्प्यावर पोहोचलो आहो ही खूप आनंदाची बातमी आहे.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या