Thursday, April 25, 2024
Homeनगरकोरोना : नगर जिल्ह्यासाठी पुण्यातील ‘आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज’ निदान व तपासणी...

कोरोना : नगर जिल्ह्यासाठी पुण्यातील ‘आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज’ निदान व तपासणी प्रयोगशाळा

सार्वमत

राज्यात जिल्हानिहाय कोरोना निदान प्रयोगशाळा

- Advertisement -

मुंबई – देशात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असलेल्या महाराष्ट्रात दोन दिवसांपासून करोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल 781 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यामध्ये विविध शासकीय, महापालिका आणि केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये निदान व तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यास दिल्लीतील आय.सी.एम.आरकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार राज्य सरकारने तातडीने जिल्हानिहाय 13 प्रयोगशाळांचे वाटप करून त्यांची यादी जाहीर केली आहे.
करोनाग्रस्तांच्या लाळेचे नमुने तपासण्यासाठी आत्तापर्यंत मुंबईमध्ये कस्तुरबा हॉस्पिटल, हाफकिन तर पुण्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी येथील प्रयोगशाळेत पाठवले जात होते. परंतु देशातीलच नव्हे तर राज्यातीलही कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने अखेर या चाचण्यांवर नियंत्रण ठेवणार्‍या केंद्र सरकारच्या दिल्लीतील आय.सी.एम.आरकडून राज्यामध्ये जिल्हास्तरीय निदान आणि तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने तातडीने कारवाई करत राज्यात 13 विविध ठिकाणी प्रयोगशाळांचे नियोजन केले. तसेच जिल्हानिहाय नियोजन केलेल्या प्रयोगशाळेतच नमुने तपासणीला पाठवणे बंधनकारक केले असून, अन्य कोणत्याही प्रयोगशाळेत कोरोना रुग्णाचे नमुने पाठवता येणार नसल्याचे परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

राज्यात कुठे आणि कशा होतील नमुन्यांच्या चाचण्या?

1) कस्तुरबा प्रयोगशाळा आणि केईम हॉस्पिटल प्रयोगशाळा : या दोन्ही प्रयोगशाळांमध्ये फक्त मुंबई महापालिकेच्या कक्षेतील रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

2) जे. जे. रुगणालय प्रयोगशाळा : इथे ठाणे आणि रायगड जिल्हा, ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका आणि नवी मुंबई महापालिकांच्या अंतर्गत हॉस्पिटलकडून येणार्‍या रूग्णांची चाचणी करण्यात येणार आहे.

3) हाफकिन प्रयोगशाळा : पालघर जिल्ह्यातील रुग्णालय त्याचबरोबर उल्हासनगर महापालिका, मीरा-भाईंदर महापालिका, भिवंडी महापालिका, वसई-विरार महापालिका, अंबरनाथ नगरपालिका, बदलापूर नगरपालिका अंतर्गत हॉस्पिटलकडून येणार्‍या रूग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात येणार आहे.

4) बी. जे. मेडिकल आणि ससून हॉस्पिटल, पुणे : या प्रयोगशाळेत सातारा जिल्ह्यातील हॉस्पिटलकडून येणार्‍या रूग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात येणार आहे.

5) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी (एनआयव्ही) : या प्रयोगशाळेत पुणे महापालिका आणि पुणे जिल्ह्यातील हॉस्पिटलकडून येणार्‍या रूग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात येणार आहे.

6) आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे : या प्रयोगशाळेत अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि सटाणा तालुका वगळून अन्य भागातील हॉस्पिटलकडून येणार्‍या रूग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात येणार आहे.

7) सरकारी वैद्यकीय कॉलेज, मिरज : कोल्हापूर, सांगली, रत्नगिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील हॉस्पिटलकडून येणार्‍या रूग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात येणार आहे.

8) डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय कॉलेज, सोलापूर : इथे सोलापूर, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातील हॉस्पिटलकडून येणार्‍या रूग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात येणार आहे.

9) श्री. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय कॉलेज, धुळे : धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिकमधील मालेगाव आणि सटाणा तालुका येथील हॉस्पिटलकडून येणार्‍या रूग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात येणार आहे.

10) शासकीय वैद्यकीय कॉलेज, औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड या जिल्ह्यातील हॉस्पिटलकडून येणार्‍या रूग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात येणार आहे.

11) ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर : अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम यवतमाळ या जिल्ह्यातील हॉस्पिटलकडून येणार्‍या रूग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात येणार आहे.

12) इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज, नागपूर : नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा या ठिकाणहून येणार्‍या रूग्णांच्या नमुन्यांची चाचणी इथे केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या