कोरोना संशयित आणखी एका महिलेचा मृत्यू

जळगाव |
जिल्हा रुग्णालयात शनिवारी कोरोना संशयित एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेस  १६ रोजी कोरोना संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. तिचे स्वॅब घेवून ते धुळ्यातील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहे. परंतु, अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही.

या रुग्णालयात शनिवारी सायंकाळपर्यंत कोरोना संशयित आठ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. ते तपासण्यासाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहे. तर २० अहवालांची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत कोरोना संशयित २८५ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील २६२ अहवाल निगेटिव्ह आले. निकषात नसल्याने दोन अहवाल नाकारण्यात आलेले आहेत. मेहरुणमधील कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाचे फेरतपासणीतील दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यास रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर सालारनगरातील एका पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. डॉक्टरांनी आतापर्यंंत २११ जणांना होम क्वारंटाइनची सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित ३७ रुग्ण दाखल आहेत.
जिल्हा रुग्णालयातील स्क्रिनिंग ओपीडीत शनिवारी ८५ जणांची तपासणी करण्यात आली. तर आतापर्यंत एकूण ४०४४ जणांचे स्क्रिनिंग झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com