Friday, April 26, 2024
Homeनगरकरोना बाधित महिलेने दिला जुळ्यांना जन्म

करोना बाधित महिलेने दिला जुळ्यांना जन्म

जिल्हा रुग्णालयात प्रसृती यशस्वी

अहमदनगर (प्रतिनिधी) –  नगर शहराजवळ काही दिवसांपूर्वी आढळलेल्या एका करोना बाधित महिलेने गुरूवारी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. येथील जिल्हा रुग्णालयात या महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली. या महिलेने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला. दोन्ही बाळांची आणि मातेची प्रकृती व्यवस्थित असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबई येथून एक गर्भवती महिला निंबळक (ता. नगर) येथे आली होती. या महिलेची 25 मे ला करोना अनुषंगाने तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी तिचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. गुरूवारी या महिलेने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला. दोन्ही बाळांचे वजन 2 किलो इतके आहे. दरम्यान, या दोन्ही मुलांची सुद्धा करोना अनुषंगाने तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

मुंबई येथील डॉक्टर भावाकडे या महिलेने आयव्हीएफ तंत्रज्ञानाने गर्भधारणेसाठी उपचार केले होते. तेथून नगरला आल्यानंतर सदर कोरोनाग्रस्त असल्याचे तपासणीत समोर आले. जिल्हा रुग्णालयात तिच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. सोबतच बाळंतपणावरही डॉक्टरांचे लक्ष होते. गुरूवारी डॉक्टरांच्या चमुने तिची प्रसृतीसाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेत दोघा चिमुकल्यांना जग दाखविले.

- Advertisment -

ताज्या बातम्या