Saturday, April 27, 2024
Homeनाशिकमालेगावमध्ये चार तर नाशिक शहरात एक कोरोनाबाधित आढळले; जिल्ह्यातील संख्या ४६ वर

मालेगावमध्ये चार तर नाशिक शहरात एक कोरोनाबाधित आढळले; जिल्ह्यातील संख्या ४६ वर

नाशिक | प्रतिनिधी 

आज नाशिक शहरात एका २४ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तर मालेगाव मध्ये नुकत्याच प्राप्त झालेल्या नमुन्यांमध्ये ४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे नाशिक जिल्ह्यात एकूण ४६ कोरोना बाधित रुग्ण झाले आहेत.

- Advertisement -

नाशिक शहरातील रूग्ण हा डॉ. जाकीर हुसेन रूग्णालयात उपचार घेत असून तो नाशिक येथील समाज कल्याण वसतीगृह परिसरातील रहिवासी आहे. तसेच मालेगावमधील वाढलेले ४ रूग्ण हे २५ वर्षीय पुरुष (मोमीनपूरा), २६ वर्षीय महिला (मोमीनपूरा), ५० वर्षीय महिला (नयापूरा), ४० वर्षीय पुरुष (मालेगांव) येथील असल्याचे समजते.

नाशिक शहरातील रूग्ण संख्या आता ४ झाली असून मालेगाव मध्ये ३९ व जिल्ह्यातील इतर तालुक्यातील ३ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आहेत, असे जिल्ह्यात एकूण ४६ कोरोना बाधित रुग्ण झाले आहेत. यामध्ये एका रुग्णाचा मालेगावी कोरोना चाचणी सिद्ध होण्यापूर्वीच मूत्यू झाला आहे.

नाशिक शहरात आढळलेल्या रुग्णावर झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. नाशिक शहरातील रुग्णांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. यामध्ये सिन्नर तालुक्यातील एक रुग्ण असून इतर चौघे नाशिक शहरातील आहेत. यामध्ये एक नाशिकरोड परिसर, दुसरा गोविंद नगर परिसर, तिसरा नवश्या गणपती व चौथा रुग्ण समाजकल्याण परिसरातील आहे.

आज नाशिक शहरात आढळून आलेला रुग्ण गेल्या काही दिवसांपूर्वी गरवारे पॉईंट इथे पोलिसांनी कंटेनरमधून शेकडो नागरिकांना ताब्यात घेतले होते. या नागरिकांना समाजकल्याण होस्टेल येथे लोक मुंबईहून येताना ताब्यात घेतले होते या सर्वांना समाजकल्याण हॉस्टेल येथे विलगीकरण करण्यात आलेल्यामधील हा तरुण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या