Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिककरांना दिलासा, रुग्णसंख्येत घट

नाशिककरांना दिलासा, रुग्णसंख्येत घट

नाशिक । Nashik

नाशिक महापालिका प्रशासनाकडुन करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाय योजनांसह अँटीजेन –

- Advertisement -

आरटीपीसीआर करोना चाचण्या, मिशन झिरो अंतर्गत मोबाईल डिस्पेन्सरीद्वारे तपासणी, फिव्हर क्लिनीक व माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यामुळे चांगले परिणाम समोर आले आहे.

शहरात नवीन दाखल रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली असुन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्क्यापर्यत आले आहे. दसर्‍याच्या पार्श्वभूमीवर करोनादहन सुरु झाल्याचे स्पष्ट झाल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात आता करोना संसर्ग कमी झाला असुन शनिवारी (दि.23) रोजी शहरात नवीन करोना रुग्णांचा आकडा 176 पर्यत खाली आहे. आता नवीन करोना रुग्णांचा आकडा 200 च्या आत आला आहे.

गेल्या दोन अडीच महिन्यापासुन महापालिकेकडुन केल्या जात असलेल्या उपाय योजनांचे चांगले फलीत समोर येत आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात सरासरी रुग्णांची संख्या 400 – 500 पर्यत गेली आहे.

पुढे सप्टेंबर महिन्यात प्रतिदिन रुग्णांचा आकडा 800 वरुन 1 हजाराच्यावर गेला होता. आता मात्र विविध उपाय योजनानंतर करोना संसर्ग कमी झाला आहे. गेल्या 11 आक्टोंबरपासुन नवीन रुग्णांचा आकडा 350 च्या आत आणि आता तो 200 च्या आत आल्याचे समोर आले आहे.

तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अचानक वाढत जाऊन ते 93 टक्क्यापर्यत जाऊन पोहचले आहे. शनिवारी (दि.23) शहरात केवळ 176 नवीन करोना रुग्ण आढळून आले असुन यामुळे आत्तापर्यत करोना रुग्णाचा एकुण आकडा 60 हजार 780 इतका झाला आहे. यापैकी 56हजार 848 रुग्ण बरे झाले असुन आत्तापर्यत मृताचा एकुण आकडा 853 इतका झाला आहे. सध्या शहरात (23 जआक्टोंबरपर्यत) 3 हजार 29रुग्णांवर उपचार सुरू आहे.

रुग्ण घट म्हणजे एकत्रीत खबरदारीचे फलीत

करोनासंदर्भात महापालिकेकडुन झालेल्या जनजागृतीनंतर नागरिकांनी जबाबदारी लक्षात घेतली आहे. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीम घराघरात पोहचल्याचे पॉझिटीव्ह परिणाम आता समोर आले आहे.

नागरिकांनी दाखविलेली सतर्कता, विभागीय कार्यालयाकडुन मास्कसंदर्भातील सुरू असलेली कारवाई यांचे एकत्रीत फलीत म्हणुन आता करोना रुग्ण घटले आहे. नागरिकांच्या सहकार्याचे चांगले परिणाम असुन नाशिककरांकडुन हीच पुढच्या काळात अपेक्षा आहे.

– डॉ. बापुसाहेब नागरगोजे, आरोग्य अधिकारी, मनपा.

- Advertisment -

ताज्या बातम्या