Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात आतापर्यंत 58 जणांना कोरोनाची लागण

पुण्यात आतापर्यंत 58 जणांना कोरोनाची लागण

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यात सध्या कोरोनाव्हायरसचे 46 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत पुणे आणि पुणे ग्रामीण मधील एकूण 58 रुग्णांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच आता मरकजला हजेरी लावलेल्यांची यादी मनपाला प्राप्त झालीय असून पहिल्या टप्प्यातील 55 नागरिकांशी संपर्क साधला आहे. यातील काही रुग्ण पॉझिटिव्ह असून दोन लोकांना होमक्वारंटाईन केल्याचं पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं. सुरुवातीला काही लोकांना लपवालपवी केली. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांमुळे कोरोना संख्या वाढली. इथून पुढे कोरोना रुग्णांची संख्या वाढणार नसल्याचं विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोनाव्हायरस रुग्णांचे आणि मृतांची संख्या वाढत असताना पुण्यात आज शनिवारी पाच कोरोना रुग्णांची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली आहे. रविवारी या पाच रुग्णांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. शुक्रवारी रात्री दोन कोरोना मुक्त नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे चोवीस तासात पुण्यात पाच जणांची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली तर दोघांना घरी सोडण्यात आले आहे.
अंगणवाडी सेवीकेच्या कुटुंबातील हे पाचही सदस्य आहेत. अंगणवाडी सेविकामुळे पती, बहिण,बहिणीचा पती, मुलगा आणि एका सदस्याला प्रादुर्भाव झाला होता. त्यानंतर या सर्व रुग्णांना नायडू रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र 14 दिवसांनंतर त्यांचे अहवाल एनआयव्हीला पाठवले होते.
एनआयव्हीच्या अहवालात या पाचही जणांचे पहिल्या टेस्टचे अहवाल निगेटिव आलेत. त्यामुळे या पाचही कोरोनामुक्त नागरिकांना रविवारी दुसरे अहवाल निगेटिव्ह आल्यावर डिस्चार्ज दिला जाणार आहे.

- Advertisement -

नायडू रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर मिस्ट चेंबर
कोरोनाव्हायरस रुग्णांवर नायडू रुग्णालयात उपचार केले जातात. त्यामुळं नायडू रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर मिस्ट चेंबर उभारला आहे. साधारण तीन लाखाचा हा मिस्ट चेंबर आहे. यामाध्यमातून पूर्ण सॅनिटेशन केलं जातंय. हे ऑटोमॅटिक असून एक माणूस गोलाकार फिरल्यास वीस सेकंदात सॅनीटायझेन होतं आहे. या चेंबरमध्ये सोडियमयम हायपो क्लोराईड कमी प्रमाणात वापरला जात आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी समाधान व्यक्त केले जात आहे.
त्याचबरोबर अशाच पद्धतीने शहरात आता फिरते सॅनीटायझर सुरु करण्यात येणार आहे. पीएमपीच्या तीन बसमध्ये हे मोबाईल सॅनीटायझरच काम सुरू आहे. येत्या काही दिवसात पुणेकरांसाठी ते उपलब्ध होणार आहे. मार्केट यार्ड, स्मशानभूमी यासारख्या गर्दीच्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. अशा बसमध्ये वीस सेकंदात पूर्ण सॅनीटायझेशन होणार आहे. त्यामुळे कोणाचा प्रसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे.

कोरोनाच्या नियंत्रणासाठी वॉररूम
कोरोनाव्हायरसच्या नियंत्रणासाठी वॉररूम तयार करण्यात आली आहे. पुणे स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल रूमचं वॉर रूम मध्ये रुपांतर करण्यात आले आहे. या वार रूममध्ये डॅशबोर्डच्या माध्यमातून कोरोना रुग्णाची पूर्ण हिस्टरी समजते. रुग्ण राहात असलेल्या परिसराची जीपीएस ट्रेकिंगनं माहिती घेतली जाते. त्यामुळं तिथं काय उपाय योजना राबवायची याबाबतचं नियोजन करण्यास मदत होते. लॉकडाऊन करण्यासही मदत होते.
त्याचबरोबर पुण्यात साधारण साडेचार हजार होम क्वारंटाईन आहेत. या नागरिकांवर संयम पच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जातोय. होम क्वारंटाईन व्यक्ती घराच्या बाहेर पडल्यास त्वरीत आम्हाला माहिती मिळते आणि त्यानुसार त्याला आम्ही पुन्हा घरामध्ये जाण्यास भाग पाडतो. या वार रूममध्ये दहा ते पंधरा तज्ञ असून मोठ्या स्क्रीनच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जातं. कोणी बाहेर पडल्यास इथे अलर्ट येतो. त्यामुळे या कठीण प्रसंगात वार रूमच्या माध्यमातून योग्य नियोजन करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होत आहे.

पुणे विभागातील कोरोना बाधितांची संख्या 104
पुणे विभागातील कोरोना सांसर्गिक एकुण रुग्ण संख्या 104 झाली असून पुणे जिल्ह्यात- 74, सातारा- 3 सांगली- 25 आणि कोल्हापूर जिल्हयात 2 रुग्ण आहेत. तपासणीसाठी पाठविलेले एकुण नमुने 2 हजार 265 होते. त्यापैकी 2 हजार 58 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून 207 नमुन्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी 1 हजार 915 नमुने निगेटीव्ह आहेत व 104 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 19 रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागामधील 8 हजार 615 प्रवाशांपैकी 3 हजार 977 प्रवाशांबाबत पाठपुरावा सुरू असून 4 हजार 638 प्रवाशांबाबत पाठपुरावा पूर्ण झाला आहे. आजपर्यंत 16 लाख 33 हजार 970 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 75 लाख 75 हजार 490 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 542 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले असल्याचे म्हैसेकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या