Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिककरांना दिलासा : दुसऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह; एक प्रलंबित

नाशिककरांना दिलासा : दुसऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह; एक प्रलंबित

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णाच्या घरातील व्यक्तींचे पाच पैकी चार अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक अहवाल अद्याप प्रलंबित असून हा अहवाल आज सायंकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या घरातील नातेवाईकांची टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे मोठा दिलासा नाशिककरांना मिळाला आहे.

हा रुग्ण कोणकोणत्या ठिकाणी जाऊन आला होता. याठिकाणी हा परिसर सील करून माहिती घेतली जात आहे. परिसर निर्जंतुक करण्याचे काम सुरु आहे. प्रशासनाकडून जवळपास दहा हजार लोकसंख्येचा हा परिसर तपासला जात आहे, यादरम्यान, संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांचे स्वॅब घेतले जात आहेत.

या रुग्णाच्या एकूण १९ नातेवाईक आणि निकटवर्तीयांचे नमुने घेण्यात आले आहेत. यातील घरातील पाच जणांचा समावेश होता. यामध्ये जवळपास ४ अहवाल आज प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले आहेत.  एका व्यक्तीचा अहवाल अजून प्रलंबित आहे. या अहवालाकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

गोविंद नगर परिसरात एकूण चार मोठे हॉस्पिटल असून ते बंद करण्यात आले आहेत. संपूर्ण परिसरात महापालिकेच्या वतीने फवारणी मोहीम सुरु आहे, नागरिकांना घराबाहेर न पडण्याची तंबी देण्यात आली आहे.

हा रुग्ण दिल्लीला जाऊन आल्यामुळे याचा शोध घेता आला. त्यामुळे नाशिकमध्ये अजूनही दिल्लीहून जाऊन आलेले नागरिक असतील तर त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या