उगावला करोनाचा रूग्ण आढळला; गावाच्या सीमा सील

उगावला करोनाचा रूग्ण आढळला; गावाच्या सीमा सील

उगाव। दि 18 वार्ताहर

येथे मुंबई येथून आलेल्या 30 वर्षीय तरूणाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात भितीचे वातावरण तयार झाले असून ग्रामपालिकेने गावात येणारे सर्व रस्ते बंद केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथे गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी मुंबई येथील 30 वर्षीय तरूण गावी उगाव येथे आला होता. येथे आल्यानंतर आरोग्य विभाग व ग्रामपालिकेने या तरूणास होम क्वॉरंटाईन करून त्याच्या स्वॅबचे नमूने घेवून ते तपासणीसाठी पाठविले होते.

त्याचा अहवाल काल सोमवार (दि.18) रोजी दुपारी खडकमाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. रोहीत लोणारे यांना नुकताच प्राप्त झाला असून हा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे.

त्यामुळे उगावमध्ये भितीचे वातावरण तयार झाले असून ग्रामपालिकेच्या वतीने गावातील सर्व रस्ते बंद करण्यात आले असून सर्व दुकाने बंद करण्यात आले आहे. करोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही पसरत असून हा संसर्ग विशेषत: मुंबईहून येणार्‍या नागरिकांमुळे पसरत असल्याने मुंबईहून येणार्‍या नागरिकांचे लोंढे त्वरीत बंद होणे गरजेचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com