Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

Share

मुंबई | प्रतिनिधी

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता पुन्हा नवीन कोरोना रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सकाळी मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 112 वर पोहोचली आहे.

नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे 6, सांगलीच्या इस्लामपूरमधील 4, पुण्याचे 3, सातारा जिल्ह्यातील 2 तर अहमदनगर, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तर सांगली इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना लागण झाल्याचे समजते आहे.

सध्या कोरोनाच्या दोन रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तर 15 रुग्णांना आज डिस्चार्ज होण्याची शक्यता आहे. यासोबतच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे संसर्ग नियंत्रित राहण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे काल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना सांगितले की, कोरोनावर उपचार नसले तरीदेखील रुग्ण बरे होताना नजरेस पडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!