Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; कुठल्या शहरात किती रुग्ण जाणून घ्या

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; कुठल्या शहरात किती रुग्ण जाणून घ्या

नाशिक | प्रतिनिधी 

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. आजच्या माहितीनुसार एकूण चार रुग्ण वाढले आहेत. आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली.

- Advertisement -

ते म्हणाले, राज्यात सकाळपर्यंत कोरोनाचे 33 रुग्ण आढळून आले होते. आता हा आकडा 37 वर गेला आहे. राज्य शासनाकडून करोनाचा सामना करण्यासाठी विविध विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. मुंबईत 4 नवे रुग्ण आढळले तर नवी मुंबईत एक रूग्ण आढळला असल्याचे डॉ. टोपे म्हणाले.

परवाच्या दिवशी पिंपरी चिंचवड येथे पाच आणि रविवारी सकाळी औरंगाबाद येथील एक रुग्ण वाढला होता. पुणे येथे एक रुग्ण कोरोनाबाधित आल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 33 झाली होती. आता मुंबईत तीन नवे रुग्ण आणि नवी  मुंबईत एक रुग्ण वाढल्याने रुग्णांची संख्या 37 वर गेली आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालये, चित्रपट गृहे बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यापाठोपात आता मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या