Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशकरोनामुळे 13 कोटी नोकर्‍यांवर येणार गदा; 12 कोटी लोक जाणार दारिद्र्य रेषेखाली

करोनामुळे 13 कोटी नोकर्‍यांवर येणार गदा; 12 कोटी लोक जाणार दारिद्र्य रेषेखाली

सार्वमत

नवी दिल्ली – करोनामुळे देशातील 13.5 कोटी लोकांच्या नोकरीवर गदा येऊ शकते 12 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जाऊ शकतात अशी धक्कादायक बाब इंटरनॅशनल मॅनेजमेंट कंस्लटिंग फर्म आर्थर डी लिटिलच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. तसंच पैशाची आवक, खर्च आणि बचत यावरही विपरित परिणाम होणार असल्याचे अहवालातून सांगण्यात आले आहे.
दरम्यान प्रतिव्यक्ती उत्पन्न कमी होणार असून जीडीपीमध्येही मोठी घसरण होणार असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं पीटीआयच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

- Advertisement -

करोनाचे वाढते रुग्ण पाहून भारतात याची W शेप रिकव्हरी होईल. त्यामुळे 2020-21 मध्ये जीडीपीमध्ये 10.8 टक्क्यांची घट होईल. तसंच 2021-22 या कालावधीत जीडीपी वाढीचा दर 0.8 टक्के असेल, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त भारतात बेरोजगारीचा दर 7.6 टक्क्यांनी वाढून 35 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. तसंच यामुळे 13.6 कोटी लोकांच्या रोजगारावर गदा येईल आणि देशात बरोजगारांची संख्या 17.4 कोटीवर जाईल, असंही त्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

याव्यतिरिक्त 12 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या कक्षेत येतील आणि 4 कोटी अत्यंत गरीब होतील असंही अहवालात सांगण्यात आलं आहे.
या अहवालामध्ये केंद्र सरकारनं आणि रिझर्व्ह बँकेनं उचललेल्या पावलांचं कौतुक करण्यात आलं आहे. परंतु अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात होणार्‍या नुकसानीला आळा घालण्यासाठी धोरणं अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचं मत आर्थर डी लिटिलचे भारत आणि दक्षिण आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मॅनेजिंग पार्टनर बार्निक मित्रा यांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या