Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रकरोना : पुण्यात पुन्हा अतिरिक्त निर्बंध

करोना : पुण्यात पुन्हा अतिरिक्त निर्बंध

सार्वमत

दहा पोलिस ठाण्यांच्याहद्दीतील परिसरात 3 मेच्या मध्यरात्री 12 पर्यंत पूर्णपणे मनाई आदेश
पुणे (प्रतिनिधी) – करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील दहा पोलिस ठाण्यांच्याहद्दीतील परिसरात 3 मेच्या मध्यरात्री 12 पर्यंत पूर्णपणे मनाई आदेश लागू केले आहेत. या काळात या ठिकाणी सकाळी दहा ते दुपारी 12 पर्यंत या वेळेत दूध विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी मनाई आदेश काढले असून या परिसरात औषधे आणि दूध वगळता सर्व प्रकारचा विक्रीस मनाई केली आहे. दुधाच्या वाहतुकीवर बंधन घालण्यात आले नसून सकाळी सहा ते दहा या वेळेत दूध विक्रीची घरपोच सेवा देता येणार आहे. अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून धान्य वितरित करण्यात येत असून त्यास मनाई करण्यात आलेली नाही. या प्रतिबंधीत क्षेत्रामधील किराणा माल, भाजीपाला व फळे, चिकन, मटन,अंडी आदी विक्री केंद्र, दुकाने तसेच इतर वितरण सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत.
पुण्यात दिवसभरातकरोनाचे 200 रुग्ण आढळून आले आहेत.करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराच्या हद्दीतील दहा पोलिस ठाण्यांच्याहद्दीतील 23 हॉटस्पॉटमधील रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश आहेत.

पुण्यात दिवसेंदिवस करोनाव्हायरसचा उद्रेक वाढतोय. पुण्यात दीड हजाराच्या टप्प्यात रुग्णांची संख्या गेली तर मृतांचा आकडा 81 च्या पुढे आहे. करोनाचा प्रादुर्भाव काही केल्यानं कमी होत नाही. शहरात कर्फ्यू लागू असताना देखील जीवनावश्यक वस्तू खरेदी वेळीही नागरिक नाहक गर्दी करताना दिसत आहे. नागरिक सकाळी आणि सायंकाळी फिरत आहेत. कारवाई केल्यानंतर देखील या नागरिकांची संख्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे शहरात करोना रुग्णांची संख्या चिंताजनकरित्या वाढत आहे. पहिल्यापासून हॉटस्पॉट ठरलेल्या भागातच हे करोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कडक उपाययोजना करून देखील त्यात काही फरक पडलेला नाही. भाजीपाला, किराणा आणि मेडिकलची दुकाने या भागात उघडी असायची. त्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत असत. त्यामुळे देखील रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्स मेंटेन करण्यासाठी पुन्हा पुण्यात अतिरिक्त निर्बंध लावण्यात आलेत. दहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवस अतिरिक्त निर्बंध राहणार आहेत. 1 मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून 3 तीन मेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत अतिरिक्त निर्बंध असेल.

अतिरिक्त निर्बंध लागू केलेल्या ठिकाणी किराणा, भाजीपाला, फळे, चिकन, मटन, अंडी यांची विक्री दुकाने वितरण सेवा पूर्ण बंद राहील. तर दूध विक्री केंद्र दिवसभरात केवळ दोन तास सकाळी दहा ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु राहील. तर घरपोच दूध वितरणासाठी सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत वेळेच बंधन असेल. माञ

पुण्यात 29 तारखेपर्यंत 1444 करोना बाधित रुग्णांची पालिकेकडे नोंद आहे. या रुग्णांपैकी 1335 रुग्णांचा नकाशाच्या माध्यमातून आढावा घेण्यात आलाय. पंधरा क्षत्रिय कार्यालयपैकी 5 क्षत्रिय कार्यालयात सर्वाधिक जास्त रुग्ण आहेत. भवानी पेठ तब्बल 266 रुग्ण आहेत. भवानी पेठे नंतर ढोले पाटील रोडला 203 शिवाजीनगर घोले रोड 190 आहेत. तर सर्वाधिक कमी दोन रुग्ण कोथरूड बावधनला आहेत.

हे आहेत नवीन प्रतिबंधित क्षेत्र
परिमंडळ एक
-समर्थ, खडक आणि फरासखाना पोलिस ठाण्याच्या अखत्यारित येत असलेला संपूर्ण परिसर.
परिमंडळ दोन
-स्वारगेट पोलिस ठाणे – गुलटेकडी, महर्षीनगर, डायसप्लॉट, इंदिरानगर, खड्डा झोपडपट्टी
-लष्कर पोलिस ठाणे- नवीन मोदीखाना, पूना कॉलेज रस्ता, मोदीखाना कुरेशी मशिदीजवळचा परिसर, भीमपुरा गल्ली, बाबाजान दर्गा, क्वाटरगेट रस्ता, शिवाजी मार्केट, सरबतवाला चौक रस्ता, शितळादेवी मंदिर रस्ता.
-बंडगार्डन पोलिस ठाणे- ताडीवाला रस्ता
सहकारनगर पोलिस ठाणे- तळजाई वसाहत, बालाजीनगर
परिमंडळ तीन
– दत्तवाडी पोलिस ठाणे- पर्वती दर्शन परिसर
परिमंडळ चार
– येरवडा पोलिस ठाणे-लक्ष्मीनगर, गाडीतळ, चित्राचौक परिसर
– खडकी पोलिस ठाणे- पाटील इस्टेट झोपडपट्टी, इराणी वस्ती पाटकर प्लॉट

- Advertisment -

ताज्या बातम्या