Type to search

Breaking News Featured maharashtra जळगाव फिचर्स मुख्य बातम्या

कोरोना : माहिती लपवली , दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Share
शहरातील एक व्यापारी दाम्पत्याने विदेशातून परतून आल्या नंतरही कोरोना तपासणी पथकाला खोटे सांगून फसवणूक केली म्हणून आरोग्य अधिकऱ्यांचे तक्रारी वरून पोलीसात साथ रोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले म्हणून गून्हा दाखल करण्यात आला आहे राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच गून्हा असावा.
राज्यात सर्वत्र कोरोना वायरसने थैमान घातले असतांना या आजाराचा फैलाव परदेशातून आलेल्यां पासून अधिक होतो शासनाने त्यांची तपासणी करून १४ दिवस विलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था केली आहे शहरातील एक स्थानिक बडे व्यवसाईक परदेशातून आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ गिरिश गोसावी यांना अज्ञात व्यक्तीने कळविली त्यांनी वैद्यकीय पथक पाठवून चौकशी केली असता त्या दांपत्याने आम्ही पूण्याला मूलाकडे गेल्याचे खोटे सांगीतले .
पून्हा दूसरे दिवशी प्रांत सिमा आहिरे त्यांचे बाबत फोनवरून माहिती मिळाली त्यांचे आदेशावून पोलीस अधिकारींच्या मदतीने त्या दांपत्याला विचारपूस पोलीस कर्मचारी शरद पाटील यांनी त्यांचा पासपोर्टची चौकशी केली  दोन्ही वेळेस तपासणी पथकाला परतविले अखेर पोलीसांचे मदतीने त्या दांपत्याशी चर्चा केली असता आम्ही थायलंड पटाया या देशातून १५ मार्चला परतल्याचे कबूल केले यावरून  वैद्यकीय अधिकारी डॉ गिरिश गोसावी यांचे तक्रारी वरून दोघांविरूध्द शासनाची व आरोग्य विभागाची दिशाभूल केल्याने १३ मार्च पासून लागू साथ रोग अधिनियम १८८७ आदेशाचे ऊल्लंघन केले म्हणून कलम २(अ) व ३ भादवी कलम  १८८ नूसार गून्हा दाखल करण्यात आला आहे
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!